मधल्या सुट्टीत 12 विद्यार्थिनींचा विनयभंग, पुण्यातील शिक्षकाला बेड्या
पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल 12 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी कारवाई करत या शिक्षकाला बेड्या ठोकल्या. जिल्हा परिषद शाळेतील हा शिक्षक मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. विक्रम शंकर पोतदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. विक्रम पोतदार हा पुण्याच्या लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या […]
पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल 12 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी कारवाई करत या शिक्षकाला बेड्या ठोकल्या. जिल्हा परिषद शाळेतील हा शिक्षक मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. विक्रम शंकर पोतदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
विक्रम पोतदार हा पुण्याच्या लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग करत होता. मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींना बोलावून तो त्यांची छेड काढायचा, अश्लील चाळे करायचा असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. तसेच ही बाब विद्यार्थिनींनी कुणालाही सांगू नये यासाठी विक्रम त्यांना धमकवायचा, असेही विद्यार्थिनींनी सांगितले. सहाव्या वर्गातील 12 विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडत होता.
हा सर्व प्रकार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात शिक्षक विक्रम पोतदारविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी विक्रम पोतदारला अटक केली असून त्याच्यावर विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.