तुमच्या स्वयंपाकघरातील गूळ शुद्ध की भेसळयुक्त? ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो
आयुर्वेदानुसार, गुळचे सेवन केल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. गुळामध्ये प्रोटिन, मॅग्निशियम आणि फायबर सारखे अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. परंतु आजकाल कोणताही पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या गुळामध्ये देखील रसयनांचा वापर केला जातो. भेसळयुक्त गुळाचे सेवन तुमच्यासाठी गंभीर ठरू शकते.
गूळ हा प्रत्येक स्वयंपाकघरात महत्त्वाचा घटक मानला जातो. गुळामुळे कोणत्याही पदार्थाला गोडवा येतोच परंतु त्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मकरसंक्रांतीच्या तिळगुळाच्या लाडू पासून ते दिवाळीच्या लाडू पर्यंत अनेक पदार्थांमध्ये गोडव्यासाठी गुळाचा वापर केला जातो. परंतु मार्केटमध्ये मिळणारा गूळ अनेकवेळा भेसळयुक्त मानला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की खरा गूळ नेमकं निवडायचा कसा?
गुळामधील भेसळीमुळे त्याच्यामधील नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतो. मार्केटमधील भेसळयुक्त गुळाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पण भेसळयुक्त गुळाचे सेवन करत नाहीत ना? असा प्रश्न अनेकांच्या मानामध्ये निर्माण होतो. चला तर जाणून घेऊया भेसळयुक्त गूळ कसा शोधायचा?
गुळाची शुद्धता कशी ओळखावीत?
१) शुद्ध गुळाचा रंग हलका तपकिरी किंवा सोनेरी पिवळा असतो. जर मार्केटमधील गुळाचा रंग खूप तेजस्वी आणि तुमच्या डोळ्यांना आकर्षित करणारा असेल तर त्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केल्याची शक्यता आहे. गुळाची चाचणी करण्यासाठी त्याचा एक छोटा तुकडा पाण्यामध्ये विरघळावा. जर त्या पाण्याचा रंग बदलला तर त्या गुळामध्ये रसायनिक रंगाचा वापर केला आहे. शुद्ध गुळ पाण्यात कोणत्याही प्रकारचे रंग सोडत नाही.
२) कधी कधी गुळाच्या ढेपेचं वजन वाढवण्यासाठी त्यामध्ये खडूची पावडर किंवा वॉशिंग सोड्याचा वापर केला जातो. एक छोटा गुळाचा तुकडा पाण्यात मिसळा. पाण्याखाली जर पांढरे ठर निर्माण झाले तर तो गूळ भेसळयुक्त आहे.
३) गुळाचा पोत आणि त्याचा कडकपणा त्याची शुद्धता दर्शवते. शुद्ध गुळ हलका मऊ आणि सहज विरघळणारा असतो. जर गुळ तुमच्या हातावर सहज चिकटत असेल तर तो शुद्ध गूळ आहे. भेसयुक्त गुळ कडक असतो आणि त्यामध्ये साखर क्रिस्टल्स किंवा इतर कृत्रिम रसायने मिसळली जातात.
४) गूळ आकर्षित दिसण्यासाठी आणि जास्त दिवस चांगला टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये सल्फरचा वापर केला जातो. गुळामध्ये सल्फर आहे की नाही तपासण्यासाठी गुळाचा छोटा तुकडा पाण्यात विरघळून त्यामध्ये हायड्राक्लॉरिक अॅसिडचे काही थेंब टाका. जर पाण्यामध्ये फोम किंवा बबल्स तयार झाले तर त्यामध्ये सल्फर वापर केला आहे.
शुद्ध गुळाची चव गोड असते व त्याचा सुगंध मातीसारखा असतो. जर गुळाची चव जास्त गोड आणि केमिकल युक्त असेल तर त्याचे सेवन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गरम वातावरणामध्ये शुद्ध गूळ विरघळण्यास सुरुवात होते. भेसळयुक्त गूळ वितळल्यावर पाणी सोडू लागते. FSSAIच्या आव्हालानुसार, शुद्ध गूळ नेहमी गडद रंगाचा असतो. मार्केटमधील रसायनिक सोनेरी पिवळ्या गुळाचे सेवन करणं टाळा. भेसयुक्त गुळेचे सेवन केल्यास तुम्हाल फूड पॉईझनिंग होण्याची शक्यता असते.