NEET-JEE ऐवजी खेळण्यांवर चर्चा, मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींची टीका
पंतप्रधानांनी परीक्षांवर चर्चा करावी अशी JEE-NEET च्या विद्यार्थ्यांची इच्छा होती, पण ते खेळण्यांवर चर्चा करुन गेले, अशी टीका राहुल गांधींनी केली
नवी दिल्ली : “मन की बात” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खेळण्यांवरील चर्चेवरुन (Rahul Gandhi Criticize PM) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी परीक्षांवर चर्चा करावी अशी JEE-NEET च्या विद्यार्थ्यांची इच्छा होती, पण ते खेळण्यांवर चर्चा करुन गेले, अशी टीका राहुल गांधींनी केली (Rahul Gandhi Criticize PM).
राहुल गांधींना रविवारी पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर ट्वीट केलं. “JEE-NEET च्या उमेदवारांना ‘परीक्षेवर चर्चा’ हवी होती, पण पीएमने ‘खेळण्यांवर चर्चा’ केली.” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर JEE-NEET परीक्षा घेण्यावरुन विरोध केला जात आहे. अशावेळी राहुल गांधींनी ‘मन की बात’ कार्यक्रमावरुन मोदींवर निशाणा साधला आहे.
JEE-NEET aspirants wanted the PM do ‘Pariksha Pe Charcha’ but the PM did ‘Khilone Pe Charcha’.#Mann_Ki_Nahi_Students_Ki_Baat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 30, 2020
पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मध्ये काय म्हणाले?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी खेळण्यांवर चर्चा केली. मोदी म्हणाले, “मी मन की बात ऐकणाऱ्या सर्व मुलांच्या आई-वडिलांची क्षमा मागतो कारण होऊ शकते की त्यांना ही मन की बात कार्यक्रम ऐकल्यावर खेळण्यांसाठी नवीन नवीन मागणी ऐकायला मिळेल. खेळणी जिथे अॅक्टीव्हिटी वाढवण्यासाठी मदत करतात तर खेळणे आपल्या आकंक्षांना देखील पंख देतात. खेळणे केवळ आपलं मंनोरंजन करत नाहीत तर हेतू ही देतात.” (Rahul Gandhi Criticize PM)
“आपल्या देशात स्थानिक खेळण्यांची एक समृद्ध परंपरा आहे. असे बरेच प्रतिभाशाली आणि कुशल कारागीर आहेत, ज्यांना चांगली खेळणी बनविण्यात खास कौशल्य प्राप्त आहे. भारतात अनेक क्षेत्र खेळणी केंद्राच्या रुपात विकसित होत आहेत.”
“जागतिक खेळणी उद्योग 7 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. व्यवसाय खूप मोठा आहे, परंतु यातील भारताचा वाटा खूपच कमी आहे. ज्या देशाजवळ इतका मोठा वारसा, परंपरा आहे, त्याचा खेळणी बाजारातील वाटा इतका कमी असावा का? स्थानिक खेळण्यांसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल”, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
JEE-NEET च्या परीक्षेवरुन देशातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. सरकार पुढच्या महिन्यात होणाऱ्या JEE-NEET च्या परीक्षांच्या समर्थनात आहे. तर विरोधीपक्षांच्या मते कोरोनाकाळात ही परीक्षा घेणे धोकादायक आहे. काही विद्यार्थ्यांनी JEE-NEET च्या परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं दारंही ठोठावलं आहे. त्यानंतर आता सहा राज्यातील सरकारांनी देखील या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे (Rahul Gandhi Criticize PM).
संबंधित बातम्या :
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गटबाजी, दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत घमासान, कोण कुणाच्या बाजूने?
काँग्रेस खासदाराचं कोरोनाने निधन, राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त