टाळ्या वाजवून काही होणार नाही, आर्थिक मदत, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला स्थगिती द्या : राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (22 मार्च) होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या घोषणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत (Rahul Gandhi on Janata Curfew).

टाळ्या वाजवून काही होणार नाही, आर्थिक मदत, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला स्थगिती द्या : राहुल गांधी
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 6:25 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (22 मार्च) होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या घोषणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत (Rahul Gandhi on Janata Curfew). कोरोना संसर्गावर नियंत्रण आणि त्यात जनतेची मदत करण्यासाठी टाळ्या वाजवून काहीही होणार नाही. जनतेसाठी आर्थिक पॅकेज, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला काही काळ स्थगिती द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले, “कोरोना व्हायरस हा आपल्या नाजूक अर्थव्यवस्थेवर मोठा आघात आहे. याचा छोटे, मध्यम व्यवसायिक आणि रोजंदारीवर जगणाऱ्या मजूरांवर सर्वाधिक प्रभाव झाला आहे. रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन गरजांचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. टाळ्या वाजवून काहीही मदत मिळणार नाही. आज आर्थिक मदत, कर सवलत आणि कर्जफेडीला स्थगिती अशा एका मोठ्या पॅकेजची गरज आहे. यासाठी तात्काळ पावलं उचला.”

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. “रविवारी (22 मार्च) सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासियांना जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकानं घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनीच घराबाहेर पडावं.”

“हा प्रयोग आपला आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पार पाडण्याच्या संकल्पाचं एक मजबूत प्रतिक असेल”, असंही मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या : 

कामगारांचे पगार कापू नका, व्यापारी आणि श्रीमंतांना पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

संबंधित व्हिडीओ:

Rahul Gandhi on Janata Curfew

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.