राहुल गांधींची 20 पेक्षा जास्त देशांच्या प्रतिनिधींशी गुफ्तगू
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी जी-20 आणि शेजारील देशांच्या उच्चायुक्तांची दिल्लीत भेट घेतली. अगोदर हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. पण 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. जवळपास दोन तास ही बैठक झाली. यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित होते. […]
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी जी-20 आणि शेजारील देशांच्या उच्चायुक्तांची दिल्लीत भेट घेतली. अगोदर हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. पण 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. जवळपास दोन तास ही बैठक झाली. यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित होते.
या भेटीबाबत काँग्रेसचे परदेश विभाग प्रमुख आनंद शर्मा यांनी माहिती दिली. ही एक अनौपचारिक भेट असल्याचं ते म्हणाले. देश आणि जगातील प्रत्येक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाली. राजकीय, आर्थिक विषय, रोजगार-व्यापार या मुद्द्यांवर चर्चा करत विचारांची देवाणघेवाण करण्यात आल्याचं आनंद शर्मा यांनी माध्यमांना सांगितलं.
Former Prime Minister Dr Manmohan Singh, UPA Chairperson Smt Sonia Gandhi and Congress President @RahulGandhi meet diplomats from G-20 and neighbouring countries in Delhi. pic.twitter.com/p7y8wbV4In
— Congress (@INCIndia) March 6, 2019
या बैठकीसाठी पाकिस्तानला अगोदरपासूनच निमंत्रण दिलं नसल्याचं आनंद शर्मा यांनी सांगितलं. काँग्रेसने अगोदरपासूनच दहशतवादाशी सामना केला आहे. आम्ही याला राष्ट्रीय आव्हान समजतो. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद स्वीकारला जाऊ शकत नाही. प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हणू नये, देशभक्तीसाठी आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आमचे दोन पंतप्रधान शहीद झालेत आणि अनेक कार्यकर्त्यांनीही बलिदान दिलंय, असं आनंद शर्मा म्हणाले.
काय आहे जी-20?
जी-20 हा जगभरातील प्रमुख 20 अर्थव्यवस्थांचा समूह आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका, युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.