Mahad Building Collapse Live | मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

महाड इमारत दुर्घटनेत जीम गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाईल, अशी घोषणा राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

Mahad Building Collapse Live | मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 7:35 PM

रायगड : जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली (Raigad Mahad Building Collapse). येथे 5 मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) रात्री जमीनदोस्त झाली आहे. यात 41 कुटुंब राहत होते. त्यातील 18 जणांना बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आणखी काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत (Raigad Mahad Building Collapse).

घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 7 जणांना बाहेर काढण्यात आलं होतं. यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांचा समावेश होता. मात्र, यापैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला. एनडीआरएफचं पथक दाखल झाल्यानंतर 12 जणांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आलं. मात्र, यापैकी 11 जण मृतावस्थेत सापडले. तर एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे.

दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू :

1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष.

2) नविद झमाने, वय 35 वर्ष

3) नाैसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष

4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष

5) अनाेळखी स्री चा मृतदेह

6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष

7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष

8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष

9) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष

10) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्ष

पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. बचाव कार्यात साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.

मृत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना पन्नास हजार रुपयांची दिले जाणार. या घटनेत ज्यांनी आपलं घर गमावलं आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

LIVE UPDATE :

  • मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.</li>
  • आतापर्यंत आठ जण जखमी तर नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
  • महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्य अद्याप कार्य सुरु, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू तर एक जखमी, नावेद जावेद झमाने, नौशिन नदीम बांगी, कुमला आदील शेखनाग, मतिन मुकादम अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत, तर मोहम्मद नदीम बांगी असे जखमीचे नाव आहे
  • एनडीआरएफच्या टीमला ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
  • ढिगाऱ्याखाली अद्याप 18 जण अडकल्याची माहिती, अडकलेल्यांचा कसून शोध
  • मोहम्मद नदीम बांगी या पाच वर्षीय चिमुकल्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश, चिमुकला किरकोळ जखमी
  • आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 9 व्यक्तींना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश
  • सात जखमींना उपचारासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 5 व्यक्तींना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे
  • महाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची, तर जखमींना दीड लाखांची मदत करणार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
  • या दुर्घटनेनंतर महाडच्या स्थानिकांमध्ये संतापाची लाट, प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा
  • इमारत कोसळण्यापूर्वी सकाळी 10 वाजता इमारतीचा एक खांब कोसळला होता. या दुर्घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि ही भीषण दुर्घटना घडली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
  • मुंबईमध्ये अशा घटना घडल्यानंतर आयुक्तांवर कारवाई होते का? जो जबाबदार असेल त्याच्यावरच कारवाई करा. आम्ही महाड येथील सर्वच बिल्डिंगचे स्ट्रकचरल ऑडिट करणार आहोत. मात्र, कुठलंही पत्र किंवा तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी सांगितलं.
  • Maharashtra: Search & rescue operation by National Disaster Response Force (NDRF) underway at the spot where a building collapsed in Kajalpura area of Raigad district y’day. (Image source: NDRF)

    As per Raigad District Collector, 2 deaths reported so far, 18 still feared trapped. pic.twitter.com/lYEc0DnhDW

    — ANI (@ANI) August 25, 2020

  • महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू, तर 18 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
  • महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
  • या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
  • घटनास्थळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दाखल
  • महाडमध्ये पावसाला सुरवात, पावसातही ढिगारा हटवण्याचे काम सुरु, ढिगारा उपसण्यात एनडीआरएफ पथक, अग्निशमन दलाला अडचण

“एनडीआरएफचे तीन पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 60 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप 25-30 जण अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

इमारत कोसळण्याची कारणं काय?

इमारतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बेसमेंटच्या पिलरची रुंदी ही इमारतीच्या अन्य पिलरच्या रुंदी एवढीच होती. महाड शहरातील काजळ पुरा मोहल्ल्यामधील हापुस तलाव या भागामध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीच्या परिसरामध्ये दरवर्षी पुराचे पाणी वेढले जात असताना या तकलादू पिलरवर संपूर्ण इमारतीचा भार पेलणे कठीण होते. महाड शहरातील पूरस्थितीमुळे अनेक इमारती अशा पद्धतीने केवळ पिलर्सवर उभ्या असून पुराच्या पाण्यामुळे चार तासांपेक्षा अधिक काळ भिजून या पिलर्समधील स्टील गंजून कमकुवत होते. त्यावरील इमारतीचा भार सहन न झाल्याने अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते.

दोषींवर कारवाई केली जाईल – एकनाथ शिंदे

ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. ही इमारत पत्त्या सारखी कोसळली आहे. अजून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं. जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे जखमी आणि मृत पावले आहेत त्यांना सरकारकडून योग्य मदत दिली जाईल. शहरात ज्या जुन्या इमारती आहेत, त्यासाठी क्लस्टर योजना आणली आहे.

Raigad Mahad Building Collapse

संबंधित बातम्या :

Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.