पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस जीवावर, रायगडमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला

म्हसळा गावातील जानसई नदीच्या पुरात परवा वाहून गेलेल्या बदर हळदे याचा मृतदेह आज सापडला.

पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस जीवावर, रायगडमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 1:08 PM

रायगड : पुराच्या पाण्यात उडी मारण्याचे साहस करणाऱ्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. रायगडमध्ये जानसई नदीत उडी मारल्यानंतर वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला. (Raigad Youth drown in Flooded Janai River found dead)

म्हसळा गावातून वाहून गेलेल्या बदर हळदे याचा मृतदेह आज सापडला. माणगावची साळुंखे टीम, दिवे आगारची वसिम फकजी टीम, श्रीवर्धन, म्हसळा, खोपोली अशा विविध भागातील रेस्क्यू टीम्स प्रयत्न करत होत्या.

अखेर पोलिसांच्या सहकार्याने दिवेआगारच्या टीमने आज (7 ऑगस्ट) पहाटे सहा वाजता निगडी गावच्या हद्दीत जानसई नदी किनारी झाडी झुडपात अडकलेला मृतदेह काढला. या शोध पथकामध्ये तौसिस अफराद, नासिर साखरकर, मोझम मालपेकर, मुझ्झमिल गोठेकर, फौजान साखरकर आणि वसिम फकजी यांचा समावेश होता.

नेमकं काय झालं?

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे दक्षिण रायगड भागातील सर्व प्रमुख नद्यांना पूर आला. म्हसळा शहरातून पाभरे भागात जाणाऱ्या मार्गावर जानसई नदीच्या पुलावर अनेक ग्रामस्थ नदीच्या पुराचा अंदाज घेत होते. त्यावेळी पूर आलेल्या नदीमध्ये पोहण्याचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांचे मनोरंजन करण्याची लहर काही युवकांना आली. (Raigad Youth drown in Flooded Janai River found dead)

जानसई नदी धोक्याच्या पातळीवर असूनही चार-पाच तरुणांनी पुलावरुन उड्या मारल्या. नदीत उड्या मारुन काही जणांनी लागलीच नदीचे तीर गाठले, मात्र 23 वर्षांच्या बदर अब्दल्ला हळदे या युवकाला नदीचा काठ गाठणे अशक्य झाले होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

नदीच्या मध्यभागी असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहातून तिरावर येण्याचा प्रयत्न बदर करत होता. मात्र वाहत्या प्रवाहातून किनारा गाठणे त्याला अशक्य झाले. अखेर पुलावर जमलेल्या ग्रामस्थांसमोरच बदर वाहून गेला. विशेष म्हणजे हा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला.

बदर प्रवाहाच्या मध्यभागी दिसेनासा झाल्यावर ग्रामस्थांची तारांबळ उडाली. परंतु पूर आलेल्या नदीच्या पाण्यात उडी मारण्याचे धाडस कोणाला झाले नाही. बदरच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर संकटच कोसळले आहे.

पहा व्हिडीओ :

संबंधित बातमी :

पुराच्या पाण्यात सूर मारला, ग्रामस्थ व्हिडीओ काढत बसले, युवक वाहून गेला!

(Raigad Youth drown in Flooded Janai River found dead)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.