पियुष गोयल यांनी यादी मागितली; संजय राऊत म्हणाले, यादी घ्या पण रेल्वे योग्य स्टेशनला पोहोचवा

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. (Piyush Goyal slams CM Uddhav thackeray Shramik train) 

पियुष गोयल यांनी यादी मागितली; संजय राऊत म्हणाले, यादी घ्या पण रेल्वे योग्य स्टेशनला पोहोचवा
Follow us
| Updated on: May 25, 2020 | 12:07 AM

मुंबई :रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक विनंती आहे, ज्या स्टेशनवर ट्रेन पोहोचायला हवी, ती त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी. गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओदिशाला पोहोचू नये,” अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आम्हाला पुढील एका तासात मजुरांची यादी द्या. तुम्ही जितक्या ट्रेन सांगाल, तितक्या ट्रेन उपलब्ध करुन देऊ,” असे ट्विट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले होते. रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवरुन संजय राऊत यांनी  जोरदार निशाणा साधला. (Piyush Goyal slams CM Uddhav thackeray Shramik train)

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. मात्र त्यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना केंद्राकडून मागणीपेक्षा कमी रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावरुन संजय राऊत यांनी पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला.

गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये : संजय राऊत

महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओदिशाला पोहोचू नये,” असे संजय राऊत म्हणाले.

रेल्वेमंत्री पियुष गोयल नेमके काय म्हणाले?

“उद्धवजी आशा आहे की तुमची प्रकृती उत्तम आहे. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. आम्ही उद्यापासून महाराष्ट्रासाठी 125 श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यास तयार आहे. पण तुम्हाला विनंती आहे की, त्यासाठी सर्व आवश्यक माहिती रेल्वे गाडी कुठून सुटणार? रेल्वे गाड्यांनुसार मजुरांची यादी, त्यांची तपासणी केलेलं आरोग्य प्रमाणपत्र आणि रेल्वे कुठून कुठे जाणार? या सर्वांची माहिती पुढील एका तासात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना द्यावी.”

“त्यानुसार आम्हाला रेल्वेचे वेळेनुसार नियोजन करता येईल. तसेच यापूर्वी प्रमाणे गाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर रिकामी परत जाऊ नये. तुम्हाला हव्या तितक्या रेल्वे गाड्या उपलब्ध करुन दिल्या जातील.” असं आश्वासनं रेल्वेमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं. (Piyush Goyal slams CM Uddhav thackeray Shramik train)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“राज्य शासनाला श्रमिकांचे ओझे नव्हते पण ते मजूर घरी जाऊ इच्छित होते. त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे 7 लाख मजूर ४८१ ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. त्यांच्या प्रवाशी भाड्याची 85 टक्के रक्क केंद्र सरकार राज्याला देईल तेव्हा देईल. पण त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी 100 टक्के खर्च करत आतापर्यंत 85 कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे.”

“राज्याची रोज 80 ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ 30 ते 40 ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे. त्यामुळेच परराज्यातील हे मजूर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Piyush Goyal slams CM Uddhav thackeray Shramik train)

संबंधित बातम्या : 

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं? थेट मदत करायची : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

राज्यात कुचकामी सरकार, थोड्या नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाची कपात करा : भाजप

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.