LIVE: पुणे, नाशिकसह औरंगाबादमध्येही पावसाची जोरदार हजेरी
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी आल्या (Summer Rain in Maharashtra ).
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी आल्या (Summer Rain in Maharashtra ). यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वातावरणात काहीसा गारवा जाणवतो आहे. पुण्यात सिंहगड, कोथरूड आणि हडपसर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाल्याने पुण्यातील उष्णतेचा पारा कमी झाला आहे. एकूणच पुणे शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
LIVE Updates
[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात” date=”25/03/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात, पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी, संपूर्ण जिल्ह्यात सौम्य ढगाळ वातावरण, वातावरणात उष्णता कायम [/svt-event]
पुणे
विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने पुण्यात सिंहगड परिसरात वीजेचा पुरवठाही खंडीत झाला. कात्रज कोंढवा-मुंडवा परिसरातही जोरदार पाऊस आला. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याचंही पाहायला मिळालं.
पुण्यातील मावळ आणि पिंपरी चिंचवड भागातही पावसाने हजेरी लावली. आधीच कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट झाला असताना आणखी अवकाळी पावसाची भर पडली आहे. पिंपरी चिंचवडसह लगतच्या मावळ तालुक्यात अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात बराच गारवा निर्माण केला. कोरोना व्हायरसला हे थंड वातावरण अनुकूल ठरु शकते, असं अनेक जाणकार सांगत आहेत. त्यामुळं थोडा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पिकांचे होणारे नुकसानाने शेतकऱ्यांना दुहेरी झटका बसतो आहे.
नाशिक
नाशिक शहरातही जोरदार पाऊस झाला. नाशिकच्या इतर भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाने शेतीचं चांगलंच नुकसान केलं. मुक्ताईनगर येथेही ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये मागील 4 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत होती. तापमानामध्ये वाढ होत असताना आज (25 मार्च) अचानक वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या आजच्या अवकाळी पावसामुळे हवेतील तापमानामध्ये गारवा जाणवत आहे.
जालना
जालना जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. साधारण एक तासापासून चांगलेच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर काही ठिकाणी सौम्य पावासाच्या सरी पाहायला मिळाल्या.
सध्या राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. या पावसाने ऐन काढणीला आलेलं शेतकऱ्याच्या हातातलं पिक वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे.
संबंधित बातम्या :
आधी कोरोनाचा कहर, आता पावसाचा अंदाज, पुढील पाच दिवसात गारपिटीसह पावसाचे संकेत
Corona Effect : पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा, किमतींनी ओलांडली शंभरी
संबंधित व्हिडीओ :
Summer Rain in Maharashtra