राज्यात ‘हिवसाळा’, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस!
मुंबई: ऐन हिवाळ्यात राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पंढरपुरात जोरदार पाऊस पडत कोसळला. रत्नागिरीत- सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आकाशात काळे ढग जमल्याने पाऊस कोसळण्याची चिन्हं आहेत. अनेक भागात पावसाने शिडकाव केला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कारण अद्याप कापलेले भात अजूनही […]
मुंबई: ऐन हिवाळ्यात राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पंढरपुरात जोरदार पाऊस पडत कोसळला.
रत्नागिरीत- सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आकाशात काळे ढग जमल्याने पाऊस कोसळण्याची चिन्हं आहेत. अनेक भागात पावसाने शिडकाव केला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. कारण अद्याप कापलेले भात अजूनही शेतात आहे. त्यामुळे नुकसानीची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पाऊस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही भागात पहाटे, तर काही भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.
लातूर- लातूरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. दिवसभराच्या उकाड्यानंतर वातावरणात गारठा पसरला. पावसामुळे लातूर शहराचा विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला. औसा, बेलकुंड, किल्लारी, रेनापूर, निठूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या.
सांगली – सांगली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. काही भागात रात्रभर तर काही भागात पहाटे पावसाचं आगमन झालं. विटा, खानापूर, कडेगाव, पलूस, आटपाडी परिसरात अवकाळी पाऊस पडला.
कोल्हापूर: शहरासह इचलकरंजीत पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.