Raj And Amit Thackeray Tennis | ‘राज’पुत्राचा एकत्र टेनिसचा डाव!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना लॉन टेनिसचे धडे दिले. बाप लेकांनी आज शिवाजी पार्क जिमखान्यात लॉन टेनिस खेळाचा एकत्र आस्वाद लुटला

Raj And Amit Thackeray Tennis | 'राज'पुत्राचा एकत्र टेनिसचा डाव!
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 10:38 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खेळावर असलेलं प्रेम सगळ्यांना माहिती आहे. स्वतःला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. मात्र आज त्यांनी त्यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनाही लॉन टेनिसचे धडे दिले. राज ठाकरे आज अमित ठाकरे यांच्याबरोबर लॉन टेनिस खेळताना दिसून आले. (Raj Thackeray And Amit Thackeray playing Lawn Tennis)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या अमोघ वक्तृत्वासाठी सतत चर्चेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लॉन टेनिस खेळण्याकरिता ते चर्चेत आले आहेत. राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज शिवाजी पार्क जिमखान्यात लॉन टेनिस खेळाचा एकत्र आस्वाद लुटला. त्यांचे टेनिस खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

शिवाजी पार्कशेजारीच राज ठाकरे यांचं ‘कृष्णकुंज’ हे निवासस्थान आहे. शिवाजी पार्कमध्ये तसंच जिमखान्यात दररोज अनेक खेळाडू प्रामुख्याने क्रिकेट आणि टेनिसचा सराव करतात. राज ठाकरे यांनी देखील गेल्या काही दिवसांपासून टेनिसचा सराव करण्याचं चांगलंच मनावर घेतलं आहे.

राजकारणात बुद्धिबळापासून ते क्रिकेटपर्यंत सगळ्याच खेळांचा कस लागतो. पण आता लॉन टेनिस या नव्या खेळाचा ‘राज’कारणात शिरकाव होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आपल्या ‘बॅक हॅण्ड स्ट्रोक’मधून The ball is in your court असं तर सुचवत नसावेत ना…?

राज ठाकरे आणि टेनिस एल्बो

राज ठाकरे यांच्या उजव्या कोपराला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यांच्या हातावर मुंबईत उपचार करण्यात आले. त्यामुळे काही काळ राज ठाकरेंच्या हाताला बँडेजही दिसत होते. मात्र आता ‘बॅक हॅण्ड स्ट्रोक’ लगावणाऱ्या राज ठाकरेंना पाहून चाहत्यांनी निश्वास सोडला.

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावं लागलं होतं.

टेनिस एल्बो म्हणजे काय?

कोपरापासून दंडाच्या दिशेने जोडलेले स्नायू सुजले तर मनगट उचलण्यासाठी, किंवा हालचाल करण्यासाठी वेदनादायी ठरतं. मनगटाचा वापर होणारी साधी कामं करतानाही अडचणी येतात. टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखे खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यावरुनच या दुखापतीला टेनिस एल्बो म्हटलं जातं.

(Raj Thackeray And Amit Thackeray playing Lawn Tennis)

संबंधित बातम्या :

Raj Thackeray Tennis | टेनिसचा आनंद लुटताना ‘राज’स मुद्रा, राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का? विद्यार्थिनीच्या प्रश्नावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.