‘हा’ हिंदी चित्रपट पाहाच, राज ठाकरेंचं आवाहन

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपट पाहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

'हा' हिंदी चित्रपट पाहाच, राज ठाकरेंचं आवाहन
Follow us
| Updated on: Dec 05, 2019 | 11:15 AM

मुंबई : हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना पुरेशा स्क्रीन मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बरेच वेळा आंदोलनं करण्यात आली आहेत. मात्र यावेळी चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच एका हिंदी चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपट पाहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी सोशल मीडियावरुन (Raj Thackeray Appeals for Hindi Movie) केलं आहे.

‘पानिपत’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट उद्या म्हणजेच शुक्रवार 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गोवारीकरांच्या खांद्यावर या ऐतिहासिक चित्रपटाची धुरा असल्यामुळे मराठी भाषिकांमध्येही सिनेमाविषयी उत्सुकता आहे. त्यातच राज ठाकरे यांनी ‘पानिपत’ चित्रपटाचं कौतुक केल्यामुळे या ऐतिहासिक महानाट्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे आतुर झाले आहेत.

‘पानिपतची लढाई ही मऱ्हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा’, असं आवाहन राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन केलं आहे.

‘पानिपत’ चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सॅनन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अजय- अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. लगान, स्वदेस, जोधा अकबर सारखे तगड चित्रपट देणाऱ्या गोवारीकरांकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

‘पानिपत’ हा चित्रपट पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालं होतं. 1761 मध्ये हरियाणातील पानिपतच्या मैदानावर झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.

VIDEO | आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’चा ट्रेलर

राज ठाकरे यांनी ‘पानिपत’ चित्रपटाच्या ट्रेलनंतरही कौतुक केलं होतं. ‘दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे’ असं राज ठाकरे (Raj Thackeray Appeals for Hindi Movie) यांनी लिहिलं होतं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.