Raj Thackeray | भरत जाधवसाठी राज ठाकरेंचं खास ट्विट, दिली ‘ही’ दाद

राज ठाकरेंनी भरत जाधव आणि केदार शिंदे यांची नव्या मालिका 'सुखी माणसाचा सदरा'चा प्रोमो शेअर करत त्यांचं कौतुक केलं.

Raj Thackeray | भरत जाधवसाठी राज ठाकरेंचं खास ट्विट, दिली 'ही' दाद
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 10:39 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या (Raj Thackeray Praises Bharat Jadhav) नव्या मालिकेवरुन त्यांचं आणि अभिनेता भरत जाधवचं भरभरुन कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांचं रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. ते नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकरांच्या अभिनयाला दाद देत असतात. आता त्यांनी भरत जाधव आणि केदार शिंदे यांची नव्या मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’चा प्रोमो शेअर करत त्यांचं कौतुक केलं (Raj Thackeray Praises Bharat Jadhav).

राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेचा प्रोमो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं.

“भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल”, असं म्हणत त्यांनी भरत जाधवचं कौतुक केलं.

Raj Thackeray Praises Bharat Jadhav

संबंधित बातम्या :

Sai Lokur | सई लोकूरचा साखरपुडा, जोडीदारासोबतचे फोटो शेअर

Majha hoshil na | पहिल्या पगारचा आनंद भारी, आदित्यकडून सईसाठी खास गिफ्ट!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.