महान संत शरदचंद्रजी पवार… राज ठाकरे यांची खोचक टीका काय?

राज्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. राज ठाकरे यांचा विदर्भात दौरा सुरु असून त्यांची आज लातूर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढले आहेत.

महान संत शरदचंद्रजी पवार... राज ठाकरे यांची खोचक टीका काय?
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 1:41 PM

राज्यात निवडणूकांचा प्रचाराला वेग आला आहे. राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा सुरु आहे.राज ठाकरे यांनी लातूर येथे झालेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणावरुन आणि समाजा-समाजात सुरु असलेल्या जातीय राज कारणावरुन राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरु झाल्याची टीका यावेळी राज ठाकरे यानी केली आहे.

राज ठाकरे यावेळी म्हणाले की मराठा समाजाने आतापर्यंत अनेक मार्चे अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत काढले होते. त्यानंतर मराठा समाजाचे मनोज जरांगे यांचे मोर्चे आंदोलन सुरु झाले.जरांगे पाटील मुंबईत मोर्चे घेऊन आले. शिंदे म्हणाले जा दिले आरक्षण. म्हणजे काय. तुमच्या हातात तरी आहे का? तामिळनाडूतही असं झालं. त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं. तामिळनाडूचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांना काही मिळाले नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. होऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही भांडत आहोत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी भाषणात सांगितले की १९९९ साली राष्ट्रवादीचा जन्म झाला. तो जन्म झाल्यावर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा. लोकांना बाहेर कसं आणायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो. जातीबद्दल प्रेम असणं वावगं नाही. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे. नेमक्या याच गोष्टी या लोकांनी केल्या आणि तुमची माथी भडकावली असेही राज ठाकरे म्हणाले

रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे.

आपण मूळ विषयाकडे जायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या करतो कुणाचं लक्ष नाही. रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे. कुणाचं लक्ष नाही. तरुण शेती सोडून शहरात जातो. कुणाचं लक्ष नाही. कृषी विद्यापीठ ओस पडले आहे. त्याकडे कुणाचं लक्ष नाही. इतके तरुण – तरुणी आणि महिलांचे प्रश्न आहे. मराठवाड्यातील आकडे पाहा, मराठवाड्यात सर्वाधिक प्रमाण महिलांना पळवून नेण्याचं आहे. मी त्या दिवशी आकडे वाचून दाखवलं. राज्यात लहान मुलींवरील बलात्काराचं प्रमाण वाढलं आहे. तरुण मुली आणि महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढले आहे. असा नव्हता महाराष्ट्र कधी, मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न आहे. विहिरीला पाणी लागत नाही.कुठून शेती करणार आहे. कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून यासाठी म्हणून जातीपातीचा विषय तुमच्यासमोर आला आहे. भांडा, बसा वाद घालत, बसा द्वेष पसरवत. त्यातून कोणाच्याही काही हाताला लागणार नाही. मूळ विषयाला लक्ष न दिल्याने त्यातून काही हाती लागणार नाही असेही राज ठाकर यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.
'...असं गाव दाखवा अन् 1 लाख मिळवा', तानाजी सावंतांचं मतदारांना चॅलेंज
'...असं गाव दाखवा अन् 1 लाख मिळवा', तानाजी सावंतांचं मतदारांना चॅलेंज.
शिंदेंच्या निवडणुकीपूर्वी10 घोषणा, लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी...
शिंदेंच्या निवडणुकीपूर्वी10 घोषणा, लाडक्या बहिणींना 1500 च्या ऐवजी....
बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना आवाहन; पवार दादांविरोधात मैदानात
बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना आवाहन; पवार दादांविरोधात मैदानात.
प्रचाराचा पहिला गेअर पडला, 'लाडकी बहीण'वरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली
प्रचाराचा पहिला गेअर पडला, 'लाडकी बहीण'वरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली.