बेपत्ता पायलटचा लवकरात लवकर शोध घ्या : राज ठाकरे
मुंबई : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केलाय. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र […]
मुंबई : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केलाय. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
बेपत्ता असलेला भारतीय वायूसेनेचा पायलट लवकरात लवकर सुरक्षित परत यावा, अशी प्रार्थना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पाकिस्तानने अटक केलेल्या पायलटचा व्हिडीओ जारी केलाय. तर एक पायलट जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही हीच गोष्ट सांगितली.
पायलट बेपत्ता असल्याचं निश्चित झाल्यानंतर भारताकडून सर्व स्तरांवर शोध घेतला जात आहे. त्याशिवाय पाकिस्तानच्या दिल्लीतील उपउच्चायुक्तांनाही समन्स बजावण्यात आलंय. परराष्ट्र मंत्रालयाकडून उपउच्चायुक्तांना याबाबत विचारणा केली जाऊ शकते.
सीमेवर पाकिस्तानची घुसखोरी
भारताच्या एअर स्ट्राईकचा बदला घेऊ, असा इशारा पाकिस्तानने काल दिला होता. शिवाय पाकिस्तानच्या जनतेमधून पाकिस्तान सरकारवर कारवाईसाठी प्रचंड दबाव होता. जनतेला काही तरी दाखवून द्यायचं म्हणून पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी नौसेरामध्ये भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. या विमानांकडून बॉम्ब टाकण्याचाही निष्फळ प्रयत्न झाला. पण सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने हा हल्ला परतवून लावला. यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला आणि रिकाम्या जागेत बॉम्ब टाकले.
व्हिडीओ पाहा :