‘मीच माझा रक्षक’, हा मंत्र महाराष्ट्राने पाळावा, राजेश टोपेंचं आवाहन
कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने मीच माझा रक्षक हा मंत्र अंगिकारावा, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे (Rajesh Tope on Corona Janta Curfew).
मुंबई : कोरोना संसर्गापासून बचावासाठी राज्यातील जनतेने ‘मीच माझा रक्षक’ हा मंत्र अंगिकारावा, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे (Rajesh Tope on Corona Janta Curfew). त्यांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राज्यातील एकूण कोरोना नियंत्रणाच्या कामाबाबत माहिती दिली. या काळात नागरिकांनी घाबरुन जाऊन अन्नधान्याची साठवणूक करु नये असंही आवाहन केलं. तसेच या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी अन्नधान्याचा काळाबाजार केल्यास कारवाईचाही इशारा दिला.
LIVETV : नागरिकांनी ‘मीच माझा रक्षक’ याप्रमाणे स्वयंशिस्त पाळावी : आरोग्यमंत्री राजेश टोपेhttps://t.co/geObg8OTjv pic.twitter.com/hFy9tMV4Ie
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2020
राजेश टोपे म्हणाले, “मीच माझा रक्षक हा महत्त्वाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांनी पाळावा. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी जे जे आवाहन जनतेला केलं, ते ते संपूर्ण देशाने पाळलं, त्याचं पालन केलं. कारण ते जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्वयंशिस्तीने एकमेकांपासून अंतर ठेवावं. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हेच कोरोना नियंत्रणातील यशाचा महत्त्वाचा मंत्र आहे.”
कोरोनाचे राज्यात आज एकूण 10 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची स्ख्या 74 झाली आहे.#CoronaVirusUpdates #LetsFightCorona pic.twitter.com/1mJS8ytDkz
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 22, 2020
संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याला लगाम लावण्यासाठी आपण शिक्षित व्हावं, यासाठी स्वयंशिस्तीत राहावं. म्हणूनच मीच माझा रक्षक मंत्राप्रमाणे गोष्टींचं पालन करावं. यामुळे आज संख्या वाढत असली तरी ती गुणाकाराप्रमाणे वाढणार नाही याचा मला विश्वास आहे. इतर देशांप्रमाणे आपल्या देशात स्थिती होणार नाही यासाठी प्रयत्न करुयात, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
“लहान मुलं आणि वृद्धांची काळजी घ्या”
राजेश टोपे म्हणाले, “लहान मुलांची वयोवृद्धांची काळजी घ्या. जे जे रुग्ण संशयित आहेत महाराष्ट्रात 74 लोक संसर्गित आहेत. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी नातेवाईकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे. आपण कोरोनाच्या फेज 2 मध्ये आहोत. 5 ते 6 संपर्कातील आणि 4 ते 5 नागरिक बाहेर देशातून आले आहेत.”
संबंधित बातम्या :
Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू
मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका, माझे कुटुंबीयही कॉरन्टाईन : संजय राऊत
Corona | कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात इटलीत 793 जणांचा मृत्यू
Rajesh Tope on Corona Janta Curfew