महाराष्ट्राला काहीसा दिलासा, राज्यात कोरोना रुग्णांची बेरीज, मात्र गुणाकार नाही : राजेश टोपे

महाराष्ट्रासह भारतातील स्थिती काहीशी दिलासा देणारी असल्याचं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं (Rajesh Tope on Corona Patient in Maharashtra).

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, राज्यात कोरोना रुग्णांची बेरीज, मात्र गुणाकार नाही : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Apr 08, 2020 | 6:52 PM

मुंबई : जगभरात ज्या वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु आहे तो पाहता जगभरात याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रासह भारतातील स्थिती काहीशी दिलासा देणारी असल्याचं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं (Rajesh Tope on Corona Patient in Maharashtra). राज्यात एकूण 1135 कोरोना रुग्ण आहेत. एक महत्त्वाचा भाग म्हणजे राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे, मात्र, गुणाकार होताना दिसत नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना संसर्गाची आणि नियंत्रणाची माहिती देताना बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील कोरोना रुग्णांचा अद्ययावत आका 1135 इतका आहे. आज जवळपास 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही प्रमाणात जरुर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वांना सांगितलं आहे. अमेरिका, इटलीसारख्या अनेक देशांप्रमाणे आपल्याकडेही कोरोना रुग्णांची वाढ गुणाकाराच्या पद्धतीने होण्याची भीती वाटत होती. या देशांमध्ये 30 व्या दिवशी 1 लाख 21 हजार इतके संसर्ग झालेले रुग्ण आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशात या रुग्णांची संख्या साडेचार ते पावणेपाच हजाराच्या दरम्यान आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या पाहिलं तर वेळीच उपाययोजना केल्याने आपल्याकडील संख्या कमी आहे.”

राज्यात एकही  रुग्ण अगदीच असायला नकोत. कुणीही आहे त्या रुग्णांचंही समर्थन करणार नाही. एक जरी रुग्णाची संख्या वाढली तरी ती आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून काळजी करणारी गोष्ट आहे. 35 ते 40 दिवसाच्या काळात रुग्णांच्या आकडेवारीत एक मोठी उसळी पाहायला मिळते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील 7 ते 8 दिवस आपले प्रयत्न सुरु राहतील. कोरोना रुग्णांच संख्या वाढते आहे मात्र, काही रुग्णांना उपचारानंतर घरीही सोडलं जात आहे. ही समाधानाची बाब आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

राजेश टोपे म्हणाले, “रुग्णालयं 3 प्रकारची असतील. ज्यांना गंभीर लक्षणं नाहीत अशा रुग्णांसाठी वेगळी 5 रुग्णालयं असतील. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांसाठी वेगळे रुग्णालयं असतील. आज आयएमएची बैठक झाली. यात राज्याचे प्रमुख पदाधिकारी आले होते. त्यांनी प्रत्येक तालुक्यात एक रक्षक रुग्णालय सुरु करणार असल्याचं सांगितलं. खासगी रुग्णालयं पूर्ण योगदान देतील. त्यांच्या सुरक्षेसाठीच्या साहित्याची व्यवस्था करण्यात येईल. आयएमएच्यावतीने मोबाईल हॉस्पिलट देखील चालवेल.”

2 एप्रिलला केंद्राचं पत्र आलं आहे. त्यात दुसऱ्या मुद्द्यात अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य केंद्र सरकार खरेदी करुन देईल असं सांगितलं आहे. मी महाराष्ट्राच्यावतीने सर्व आवश्यक वस्तूंची आकेडवारी केंद्राला कळवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला हे साहित्य कधी मिळणार याची कालमर्यादा सांगण्यास सांगितली आहे. जेणेकरुन उशीर होणार असेल तर महाराष्ट्र राज्यातील पुरवठादारांची क्षमता वाढवण्यासाठी काम करेल. यासाठी राज्यात तयार होणारं वैद्यकीय साहित्य राज्यातच वापरलं जाईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असंही टोपे यांनी नमूद केलं.

रॅपिड टेस्टने कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही याबाबत खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे राज्य सरकार याबाबत सावध भूमिका घेत आहे. मात्र, केंद्राच्या सुचनेनुसार आम्ही येणाऱ्या काळात त्यावर विचार करु, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख दोघेही MBBS, धडाकेबाज प्लॅनिंग, चंद्रपुरात एकही कोरोना रुग्ण नाही!

नागपूरकरांना आता घरबसल्या तक्रार करता येणार, तुकाराम मुंढेंकडून नागपूर लाईव्ह अॅप लाँच

17 तज्ज्ञांचा सल्ला, केरळचा जबरदस्त लॉकडाऊन प्लॅन महाराष्ट्रही राबवणार?

घराबाहेर मास्क न वापरणाऱ्यांना बेड्या ठोकणार, मुंबई महापालिकेचं कडक पाऊल

Rajesh Tope on Corona Patient in Maharashtra

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.