Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण रेवनाथची चर्चाच नाही : राजू शेट्टी

"एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही (Raju Shetti on Sushant Singh Rajput suicide case).

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण रेवनाथची चर्चाच नाही : राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 11:01 AM

नाशिक : “एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही, हे दुर्दैवी आहे”, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. गेल्या काहीदिवसांपासून दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली नाही (Raju Shetti on Sushant Singh Rajput suicide case).

“आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीत. आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणार”, असंही राजू शेट्टी यांनी सांगितले.

“सरकारने 6 एप्रिल पूर्वी दूध संघाचं संकलन आणि नंतरचे संकलन याचे ऑडिट करावं. उत्पादकांच्या नावावर सरकारचा दूध केंद्रांवर डल्ला”, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.

देवाची पूजा करणारा शेतकरी आज संकटात सापडला आहे. देऊळ, मंदिर, मस्जिद उघडणं महत्वाचे नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले.

नुकतेच राजू शेट्टींसह 40 आंदोलकांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाच्या भुकटीच्या आयात बंदी आणि दूध दर वाढ दिली जात नसल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला होता. परंतु, मोर्चाला परवानगी नसताना देखील कोरोना काळातील नियमांचं उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरुन बारामतीत राजू शेट्टींवर गुन्हा दाखल झाला आहे (Raju Shetti on Sushant Singh Rajput suicide case).

संबंधित बातम्या :

Raju Shetti | राजू शेट्टींसह 40 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल

Raju Shetti | दूध अनुदानावरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

बारामतीत जाऊन राजू शेट्टी म्हणाले, “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.