Rakul Preet Singh | मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी रकुलप्रीत सिंह हायकोर्टात
माध्यमांमध्ये (Media) आपल्याविषयी येणाऱ्या बातम्या, छापून येणारे लेख यावर बंदी आणावी, यासाठी अंतरिम आदेश देण्यात यावे, असी याचिका रकुलप्रीत सिंहने उच्चन्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आल्याने अभिनेत्री रकुलप्रीत सिंहच्या (Rakul Preet Singh) अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. एनसीबी चौकशी झाल्यानंतर रकुलप्रीतने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माध्यमांमध्ये (Media) आपल्याविषयी येणाऱ्या बातम्या, छापून येणारे लेख यावर बंदी आणावी, यासाठी अंतरिम आदेश देण्यात यावे, असी याचिका रकुलप्रीत सिंहने उच्चन्यायालयात दाखल केली आहे. तिच्या या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे (Rakul Preet Singh reached Delhi High Court to stop media Media trial).
चित्रीकरणात व्यस्त असताना समन्सबद्दल कळले
रकुलप्रीत सिंहने (Rakul Preet Singh) आपले वकील हिमांशू यादव, अमान हिंगोरानी आणि श्वेता हिंगोरानी यांच्यामार्फत सादर याचिका दाखल केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रकुलप्रीतला समन्स बजावले असून, 24 सप्टेंबरला तिला चौकशीसाठी हजर राहायचे आहे, अशी बातमी 23 सप्टेंबर रोजी मिडीयाने (Media) चालवलेली होती. ही बातमी प्रसिध्द झाली तेव्हा रकुलप्रीत सिंह हैदराबादमध्ये चित्रीकरणात व्यस्त होती. आणि ही बातमी पाहून तिला धक्का बसला, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
आधी समन्स मिळालेच नाहीत
रकुलप्रीतला (Rakul Preet Singh) तिच्या हैदराबाद अथवा मुंबईच्या पत्त्यावर कोणतेही समन्स मिळाले नव्हते. यामुळे ती हैदराबादलाच थांबली होती. 24 सप्टेंबर रोजी रकुलप्रीतचे वडील निवृत्त कर्नल कलविंदर सिंह यांनी मिडियाच्या या बातम्यांमधील तथ्य जाणून घेण्यासाठी सकाळी विमानाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याआधीच मिडियाने (Media), समन्स मिळाल्याने रकुलप्रीत मुंबईत दाखल, अशी खोटी बातमी पसरविण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी ती हैदराबादमध्येच होती, असे या याचिकेत म्हटले आहे. (Rakul Preet Singh reached Delhi High Court to stop media Media trial)
24 सप्टेंबरला मिळाला समन्स
याचिकेत केलेल्या दाव्यानुसार, 23 सप्टेंबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 अंतर्गत बजावण्यात आलेला समन्स रकुलप्रीतला 24 सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅपद्वारे सकाळी 11.20च्या सुमारास मिळाला. यात 24 सप्टेंबरला सकाळी 10 वाजेपर्यंत एनसीबीसमोर (NCB) हजर राहावे लागेल, असे म्हटले होते.
ड्रग्ज चॅटची कबुली
एनसीबी चौकशी दरम्यान, आपण ड्रग्ज बाळगले असल्याचे रकुल प्रीतने कबुल केले आहे. मात्र, ड्रग्ज सेवन करण्याचा आरोप अभिनेत्रीने फेटाळून लावाला. ‘2018मध्ये आपण रिया चक्रवर्तीसह ड्रग्ज चॅट (Drug Chat) केले होते. मेसेज करून रिया तिचे ड्रग्ज मागत होती. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज माझ्या घरात होते’, असे रकुल प्रीतने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.
(Rakul Preet Singh reached Delhi High Court to stop media Media trial)
VIDEO : Headlines | मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी रकुलप्रित सिंह हायकोर्टात https://t.co/V93HxW31Pf
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
संबंधित बातम्या :
होय, ड्रग्ज माझ्या घरात होते, एनसीबी चौकशी दरम्यान रकुल प्रीत सिंहची कबुली
ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका कशी अडकली? व्हॉट्सअॅप चॅट ते जया साहाचा जबाब, पुराव्यांची मालिकाच