Ram Mandir : भारतातल्या या ठिकाणी आहे त्रेता युगातले सरोवर, जेथे कावळ्याने गरूडाला ऐकवली होती रामायणातील कथा

Ram Mandir पौराणिक ग्रंथांमध्ये लोमेश ऋषींच्या शापामुळे काकभुशुंडी कावळा झाला, त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कावळ्याच्या रूपात व्यतीत केले, असा उल्लेख आहे. वाल्मिकींच्या आधीही काकभुशुंडीने गरुडाला रामायणाची कथा सांगितली होती असे म्हणतात. असे म्हणतात की, मेघनादाशी जेव्हा राम युद्ध करत होते, तेव्हा प्रभू रामाला नागाने बांधले होते, तेव्हा गरुडाने रामाला मुक्त केले होते.

Ram Mandir : भारतातल्या या ठिकाणी आहे त्रेता युगातले सरोवर, जेथे कावळ्याने गरूडाला ऐकवली होती रामायणातील कथा
काकभुशुंडीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 1:33 PM

मुंबई : अयोध्येत रामललाच्या (Ramlala Ayodhya) प्राणप्रतिष्ठा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्ताने आज आपण अशाच एका तलावाची माहिती जाणून घेणार आहोत, जिथे एका कावळ्याने गरूडाला रामायणाची कथा सांगितली होती. ज्याबद्दल तुम्हीसुद्धा क्वचितच ऐकले असेल.  मान्यतेनुसार भारतातील उत्तराखंडमध्ये त्रेता युगातील एक सरोवर आहे, जिथे प्रत्येक कणात काही ना काही रहस्य दडलेले आहे. उत्तराखंडमध्ये अजूनही उंच पर्वत आणि शिखरांसह अनेक रहस्यमय ठिकाणे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक काकभूशुंडी तलाव आहे ज्यामध्ये अनेक रहस्ये आहेत. तेथील स्थानिक लोकांमध्ये या तलावावर प्रचंड श्रद्धा आहे. आता ते पर्यटन स्थळ बनले आहे. या तलावात पर्यटक स्नानासाठी येताना दिसतात.

काकभुशुंडी तलाव हे प्राचीन काळापासून पवित्र असल्याचे मानले जाते. त्रेतायुगाशी संबंधित या सरोवराविषयी अनेक रहस्य आणि धार्मिक श्रद्धा आहेत. त्यामुळेच या तलावावर स्थानिक लोकांची मोठी श्रद्धा असून लोकं पापमुक्त होण्यासाठी येथे स्नान करण्यासाठी येतात.

रामायणाशी संबंधित आहे हे रहस्य

हा काकभुशुंडी तलाव आजही सर्वात खास मानला जातो, कारण त्याचा इतिहास रामायण काळाशी संबंधित आहे.असे मानले जाते की रामायणातील एक पात्र काकभुशुंडीने कावळ्याचे रूप घेऊन येथे रामायण कथा गरुडाला सांगितली होती. या कारणास्तव हा तलाव अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की येथे स्नान केल्याने लोकांचे पाप धुतले जातात आणि त्यांचे पुण्य वाढते.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या काय आहे पौराणिक कथा?

पौराणिक ग्रंथांमध्ये लोमेश ऋषींच्या शापामुळे काकभुशुंडी कावळा झाला, त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कावळ्याच्या रूपात व्यतीत केले, असा उल्लेख आहे. वाल्मिकींच्या आधीही काकभुशुंडीने गरुडाला रामायणाची कथा सांगितली होती असे म्हणतात. असे म्हणतात की, मेघनादाशी जेव्हा राम युद्ध करत होते, तेव्हा प्रभू रामाला नागाने बांधले होते, तेव्हा गरुडाने रामाला मुक्त केले होते. त्यावेळी गरुडाला आपणच देव असल्याचे समजले, जेव्हा ते ब्रह्मदेवाकडे हे जाणून घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी गरुडाला भगवान शिवाकडे पाठवले आणि तेथून भगवान शिवाने गरुडाला काकभुशुंडीला पाठवले. मग गरुडाला रामायण कथेची माहिती काकभूशुंडीच्या माध्यमातून मिळाली.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.