Ram Vilas Paswan | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे.
नवी दिल्ली : गेली पाच दशकं भारतीय राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे आणि राजकीय हवेचा अचूक अंदाज हेरणारे मुरब्बी राजकारणी, लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.पासवान यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील संघर्षशील नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. (Union Minister and LJP leader Ram Vilas Paswan passes away)
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं। Miss you Papa… pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020
रामविलास पासवान यांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया काहीच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्या निधनानंतर “बाबा…. तुम्ही आता या जगात नाहीत, पण मला माहिती आहे की तुम्ही जिथेही असाल माझ्यासोबत नेहमी असाल”, असं भावनिक ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.
बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी 1960 च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. 1989 मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.
Union Minister and LJP leader Ram Vilas Paswan passes away, tweets his son Chirag Paswan. pic.twitter.com/YQi5oNHz8Q
— ANI (@ANI) October 8, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्विट
“मी रामविलास पासवान यांच्या जाण्याने खूप दुःखी आहे. देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही. रामविलास पासवान यांचं निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत नुकसान आहे. मी एक मित्र, मुल्याधिष्टित सहकारी आणि गरीबांना सन्मानाचं जगणं देण्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला कमावलं आहे. रामविलास पासवान हे राजकारणात खूप कष्टाने पुढे आले. एक युवा नेते म्हणून त्यांनी आणीबाणी काळात होणारे जुलूम आणि अत्याचार यांना प्रखर विरोध केला. ते उत्कृष्ट संसदपटू आणि मंत्री होते. त्यांनी अनेक धोरणं तयार करताना महत्त्वाचं योगदान दिलं.” या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासवान यांना आदरांजली वाहिली.
I am saddened beyond words. There is a void in our nation that will perhaps never be filled. Shri Ram Vilas Paswan Ji’s demise is a personal loss. I have lost a friend, valued colleague and someone who was extremely passionate to ensure every poor person leads a life of dignity. pic.twitter.com/2UUuPBjBrj
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2020
राहुल गांधींचं ट्विट
रामविलास पासवान जी के असमय निधन का समाचार दुखद है। ग़रीब-दलित वर्ग ने आज अपनी एक बुलंद राजनैतिक आवाज़ खो दी।
उनके परिवारजनों को मेरी संवेदनाएँ।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 8, 2020
शरद पवार यांचे ट्विट
Saddened to hear about the demise of Shri Ramvilas Paswan. He was a veteren leader and founder of Lok Janshakti Party. I had a long association with him as a Parliamentarian. My sincere condolences to his family. RIP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2020
नितीन गडकरी यांचे ट्विट
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान जी के निधन की खबर से मैं स्तब्ध हूं। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि। गरीब, वंचित तथा शोषितों के उत्थान में पासवान जी का महत्वपूर्ण योगदान रहा है। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें और परिजनों को संबल दे। ॐ शांति।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 8, 2020
संबंधित बातम्या :
PHOTO | रामविलास पासवान: भारतीय राजकारणातील संघर्ष नायक!
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक पत्र
(Union Minister and LJP leader Ram Vilas Paswan passes away)