तब्लिगींना गोळ्या घालण्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी मागे घ्यावं : रामदास आठवले
राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मी विरोध करतो. यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असं रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale on Raj Thackeray)
मुंबई : तब्लिगींना गोळ्या घालण्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मागे घ्यावं, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तब्लिगींवर कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र गोळ्या घालण्याची भूमिका चुकीची असल्याचं आठवले म्हणाले. (Ramdas Athawale on Raj Thackeray)
मरकजला गेलेल्या तब्लिगींना गोळ्या घाला, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. राज ठाकरे यांचं वक्तव्य अगदी बेकायदेशीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला चिर देणारं आहे. अशा पद्धतीने गोळ्या मारण्याची भाषा इंग्रजांच्या काळामध्ये होती, पण आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मी विरोध करतो. यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
राज ठाकरे यांच्या एका भावनेशी मी सहमत आहे. तब्लिगींमुळे कोरोना वाढलेला आहे. जवळजवळ तीस टक्के केसेस या मरकजला गेलेल्या तब्लिगींमुळे वाढल्या आहेत. त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यांनी काही मुद्दाम हा रोग पसरवला, असं म्हणता येणार नाही. मात्र ते एकत्र जमले, ही चूक आहे. त्यांनी अशा पद्धतीने लॉकडाऊन असताना कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं.
वाचा : उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे
मरकजला गेलेल्या तब्लिगींवर कारवाई होणे आवश्यक आहे. लॉकडाऊन तर आहेच, पण त्यांना लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे. परंतु त्यांना गोळ्या घालण्याची ही भूमिका चुकीची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी नम्र विनंती आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गोळ्या मारण्याची भाषा योग्य नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा विरोध करतो. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत, त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी नम्र सूचना रामदास आठवले यांनी केली. (Ramdas Athawale on Raj Thackeray)
राज ठाकरे काय म्हणाले होते ?
“दिल्लीला मरकजचा प्रकार घडला. अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांच्या उपचार कसेल करताय तुम्ही? यांना कुठला वेगळा स्वतंत्र विभाग करावा आणि त्यांचे उपचार बंद करुन टाकावे. त्यांना या दिवसांमध्ये धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करायचं असेल की देश संपवू, असे राज ठाकरे म्हणाले होते.
या लोकांना फोडून काढलं पाहिजे
“हे लोक नोटांना थुंकी लावत आहे. भाज्यांना थुंकी लावत आहेत. नर्सेससमोर नग्न फिरत आहेत. लोकांच्या अंगावर थुकतात. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे नेमकं काय चाललंय?” असेही राज ठाकरे म्हणाले होते.
“मुसलमानांमधील काही औलादी आहेत जे काही असे कृत्य करत आहेत. या सगळ्यांना ठेचलं पाहिजे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लॉकडाऊन देशात काही दिवसांसाठीच आहे. नंतर आम्ही आहोतच,” असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.
On 20th February, when the #COVID19 situation was not as bad in India, I gave the slogan of ‘go corona, corona go’. At that time people were saying, will this make corona go away? Now we are seeing this slogan all across the world: Union Minister Ramdas Athawale (5.04.20) pic.twitter.com/jZOeR59wPA
— ANI (@ANI) April 6, 2020
(Ramdas Athawale on Raj Thackeray)