लग्नात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तसेच लग्नात उपस्थित राहिलेल्या सर्वांची कोरोना तपासणीही करण्यात आली होती. तसेच लग्न सभागृहात सतत सॅनिटायझर करण्यात आले होते.
मिहीकानेही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करताना राणा दग्गूबाती म्हणाला, अँड इट्स ऑफिशिअल.
लॉकडाऊन असल्यामुळे दग्गूबाती याने इतरांना साखरपुड्यासाठी आमंत्रण दिले नव्हते. या दरम्यान फक्त राणा आणि मिहीकाच्या कुटुंबातली लोकं उपस्थित होते.
साध्या पद्धतीने साखरपुडा करण्यात आला. यावेळी दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. राणा आणि मिहीका हिवाळ्यात लग्न करणार आहेत.