अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट (Amisha patel arrest warrant) जारी केला आहे.

अभिनेत्री अमीषा पटेलविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 4:53 PM

रांची (झारखंड) : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट (Amisha patel arrest warrant) जारी केला आहे. चित्रपट निर्माता अजय कुमार सिंह यांनी 2 कोटी 5 लाखांची रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अमीषा पटेलवर केला आहे.  त्यामुळे अमीषाच्या अडचणीत वाढ होण्याची (Amisha patel arrest warrant) शक्यता आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी निर्माता अजय सिंह यांनी कोर्टात धाव घेतली.

अमीषाने चित्रपट ‘देसी मॅजिक’साठी निर्मात्याकडून 3 कोटी रुपये उसने घेतले होते. त्यानंतर अमीषाने निर्मात्याला पैसे चेकच्या माध्यमातून परत केले. पण चेक बाऊन्स झाल्यामुळे निर्मात्याने अमीषासोबत संपर्क साधला. सतत संपर्क साधूनही समोरुन उत्तर न आल्याने अजय सिंह यांनी अमीषाविरोधात तक्रार दाखल केली.

कोर्टानेही या संदर्भात अमीषाला समन्स बजावला होता. ज्यामध्ये म्हटले होते की, येत्या सुनावणीला अमीषाने उपस्थित राहावे. अन्यथा तुम्हाला अटक केली जाऊ शकते.

“मी बऱ्याचदा अमीषाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिने काही उत्तर दिले नाही. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे समजल्यावर मी गुन्हा दाखल केला”, असं अजय सिंह म्हणाले.

याआधीही अमीषावर पैशांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. एका लग्न समारंभातील कार्यक्रमासाठी अमीषाने 11 लाख रुपये घेतले होते. पण पैसे घेऊनही ती तेथे आली नव्हती, असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.