‘फेसबुकची मोदी सरकारसोबत तडजोड’, माजी अध्यक्षांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केल्याने काँग्रेसचा गंभीर आरोप

काँग्रेसने फेसबुक इंडियावर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे.

'फेसबुकची मोदी सरकारसोबत तडजोड', माजी अध्यक्षांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केल्याने काँग्रेसचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 9:42 PM

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर अनेकदा पक्षपातीपणाचा आरोप झाला आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसने फेसबुक इंडियावर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकने माजी लोकसभा अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मीरा कुमार यांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलं आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं (Randeep Singh Surjewala criticize Facebook India on Meera Kumar Facebook page block).

सुरजेवाला म्हणाले, “फेसबुक इंडियाच्या प्रमुखांनी मोदी सरकारच्या अजेंड्यासाठी कशी तडजोड केली हे आम्ही पाहिलं आहे. आता माजी लोकसभा अध्यक्ष आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या मीरा कुमार यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं. यातून विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी खालच्या स्तरातील रणनीतीचा उपयोग केला जात असल्याचं सिद्ध होत आहे.”

या मुद्द्यावर स्वतः मीरा कुमार यांनी देखील ट्विट केलं आहे. मीरा कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये फेसबुक पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात मीरा कुमार यांच्या फेसबुक पेजवर आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचं उल्लंघन झाल्याचं आणि हे पेज अप्रकाशित केल्याचं सांगण्यात आलं आहे.

मीरा कुमार बिहारच्या राजकारणातील प्रभावी व्यक्ती आहेत. त्यामुळे या काळात त्यांच्या पेजवरील या कारवाईला त्यांनी तीव्र आक्षेप घेत मुद्दा बनवलं आहे. मीरा कुमार म्हणाल्या, “फेसबुक पेज ब्लॉक करण्यात आलंय. मात्र असं का? हा लोकशाहीवरील मोठा हल्ला आहे. बिहार निवडणुकीआधी माझं फेसबुक पेज ब्लॉक करणं हा फक्त एक योगायोग नाही.”

फेसबुककडून दिल्ली दंगल प्रकरणी दिल्ली सरकारच्या समितीसमोर हजर न राहण्याबाबत याचिका

दरम्यान, दिल्ली सरकारने दिल्ली दंगलप्रकरणी शांती आणि बंधुत्व समितीची स्थापना केली आहे. या समितीने या प्रकरणी फेसबुकला समन्स करुन चौकशीसाठी बोलावलं. मात्र, फेसबुकने याला न्यायालयात आव्हान देत उपस्थित राहण्यास नकार दिलाय. न्यायालयाने देखील त्यांना तशी सवलत दिली आहे. केंद्र सरकारने देखील या आदेशाला विरोध केला होता.समितीच्या नोटीसविरोधात फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष अजीत मोहन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याच्या सुनावणीत फेसबुकच्यावतीने वकिल साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते, ‘मी दिल्ली समितीसमोर हजर राहण्यास तयार नाही. फेसबुक लोकांना केवळ मंच देतो. तो स्वतः काहीही लिहित नाही.’

हेही वाचा :

‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र

Facebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये काँग्रेस-AAP चाही समावेश

‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती

Randeep Singh Surjewala criticize Facebook India on Meera Kumar Facebook page block

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.