PHOTO : सुषमा स्वराज यांचे दुर्मिळ फोटो

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं.

| Updated on: Aug 07, 2019 | 3:25 PM
सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1953 मध्ये हरियाणातील अंबाला छावणीत झाला होता. सुषमा स्वराज यांचे वडील आणि आजोबा दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. त्या साधारण 2 वर्षांच्या असताना आपल्या मोठ्या भावासोबतचा हा फोटो त्यांनी काही वर्षांपूर्वी ट्विट केला होता.

1 / 29
भारत-चीन युद्धादरम्यान सुषमा स्वराज अवघ्या 10 वर्षाच्या होत्या. त्यादरम्यान त्या आपल्या वडिलांसोबत अंबाला रेल्वे स्टेशनवर जात असत. त्यावेळी गाड्या थांबल्यानंतर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी देशभक्तीपर गाणी लावली जात.

2 / 29
सुषमा स्वराज यांच्या पतीचे नाव स्वराज कौशल आहे. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता.

3 / 29
पंजाबच्या चंदीगड विद्यापीठाच्या लॉ विभागात सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल वकीलीचे शिक्षण घेत होते. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि 13 जुलै 1975 ला त्यांचा विवाह झाला.

4 / 29
सुषमा स्वराज यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून केली. त्यानंतर त्यांनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीपासून त्यांना राजकारणाची आवड होती.

5 / 29
त्यांची राजकीय कारकीर्द 1970 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत चांगले संबंध होते. त्यामुळे 1975 पासून त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या कायदेशीर पथकाचं काम करायलाही सुरुवात केली.

6 / 29
आणीबाणीनंतर सुषमा स्वराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अल्पावधीतच त्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या म्हणून पुढे आल्या.

7 / 29
1977 साली जुलैमध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 1979 मध्ये त्यांच्यावर हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, जेव्हा त्यांचं वय केवळ 27 वर्षे होतं. हरियाणामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

8 / 29
सुषमा स्वराज 1990 मध्ये राष्ट्रीय पातळीवर राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनवले होते. त्यानंतर 1996 मध्ये सुषमा या दक्षिण दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसाच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

9 / 29
ऑक्टोबर 1998 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या.

10 / 29
सुषमा स्वराज यांच्यासाठी 1999 हे वर्ष फार महत्त्वपूर्ण होते. 1999 मध्ये काँग्रेसच्या 
तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमधील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपला सोनिया गांधीविरोधात कोणताही उमेदवार मिळत नव्हता. म्हणून त्यांनी सुषमा यांना बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते.

सुषमा स्वराज यांच्यासाठी 1999 हे वर्ष फार महत्त्वपूर्ण होते. 1999 मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमधील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपला सोनिया गांधीविरोधात कोणताही उमेदवार मिळत नव्हता. म्हणून त्यांनी सुषमा यांना बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते.

11 / 29
या निवडणुकीत विजय मिळावा म्हणून सुषमा स्वराज अवघ्या 30 दिवसात कन्नड भाषा शिकल्या होत्या आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी कन्नड भाषा वापरली होती. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांच्याविरोधातील निवडणूक त्या 7 टक्के मतांच्या फरकाने पराभूत झाल्या होत्या.

12 / 29
सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सुषमा स्वराज यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधातही प्रचार केला आहे. इंदिरा गांधी 1978 मध्ये कर्नाटकमधील चिकमंगळूरमध्ये पोटनिवडणूक लढवत होत्या.

13 / 29
काँग्रेसविरोधात जेव्हा सुषमा यांनी निवडणूक जिंकली तेव्हा त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले.

14 / 29
12 ऑक्टोबर 1998 मध्ये दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना सुषमा स्वराज

15 / 29
सुषमा स्वराज भाजप नेते आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या जबरदस्त चाहत्या होत्या. त्या नेहमी शत्रुघ्न सिन्हा यांचे चित्रपट बघायच्या. तर दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हाही सुषमा यांचे चाहते आहेत.

16 / 29
सुषमा स्वराज यांची उंची कमी असल्याने शत्रुघ्न सिन्हा त्यांना द लाँग अँड शॉर्ट ऑफ भाजप असे म्हणतं.

17 / 29
जे. पी. नारायण यांच्यासोबत त्यांच्या पाटणा येथील घरात सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल

18 / 29
राजकारणात जरीही पक्षात मतभेद असतील, तरीही सुषमा स्वराज सर्व पक्षातील नेत्यांशी आपुलकीने बोलत, त्यांच्याशी चर्चा करतं.

19 / 29
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि सुषमा स्वराज यांच्या भेटीदरम्यानचा फोटो

20 / 29
सुषमा स्वराज यांनी 2010 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

21 / 29
सुषमा स्वराज उपमुख्यमंत्री व्यंकय्या नायडू यांना भाऊ मानत असे. त्या दरवर्षी रक्षाबंधनावेळी व्यंकय्या नायडू यांना राखी बांधायच्या.

22 / 29
सुषमा स्वराज राजकारणासोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही त्या खूप आनंदी असायच्या. त्या प्रत्येक सण साजरा करायच्या. 2005 मध्ये तीज हा सण इतर महिलांसोबत साजरा करतानाचा क्षण

23 / 29
त्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गुरु आणि आपले आदर्श मानत

24 / 29
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप नेते राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करताना

25 / 29
2003 मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मिठाई भरवताना

26 / 29
2014 ते 2019 या काळात त्यांनी भाजपच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. त्या 7 वेळा खासदार आणि 3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

27 / 29
सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.

28 / 29
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) निधन झालं.

29 / 29
Follow us
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.