Corona Free | रत्नागिरीतील ‘हा’ तालुका कोरोनामुक्त, दिवसभरात एकही रुग्ण नाही!

राजापूर तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. (Ratnagiri Rajapur taluka Corona free after six month)

Corona Free | रत्नागिरीतील 'हा' तालुका कोरोनामुक्त, दिवसभरात एकही रुग्ण नाही!
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 1:35 PM

रत्नागिरी : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असल्याचे बोललं जात आहे. राज्यातील अनेक कोरोना हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. नुकतंच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तब्बल सहा महिन्यानंतर राजापूर तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. (Ratnagiri Rajapur taluka Corona free after six month)

राजापूर तालुक्यात आतापर्यंत 338 जणांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून राजापुरात दररोज अनेकांना कोरोनाची लागण होती. मात्र काल (2 ऑक्टोबर) एकही कोरोनाबाधित व्यक्ती राजपूरमध्ये आढळला नाही. महसूल, आरोग्य, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांचे योगदानामुळे हे शक्य झालं आहे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी बबीता कमलापूरकर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यानं रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या आता कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं आहे. मात्र रत्नागिरीत कोरोनामुळे आतापर्यंत 316 जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जवळपास 3.73 टक्के एवढं आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर हा राज्यापेक्षाही जास्त आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे.

या मृत्यू झालेल्यांमध्ये 40 ते 60 वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये इतर आजार असलेले रुग्ण म्हणजेच हृदयरोग, डायबेटीस, रक्तदाब, किडनीचे आजार रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान हा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचीही कडक अंमलबजावणी करण्यात येत असून या अभियानामुळे वेळेवर आजाराचे निदान होत आहे. त्यामुळे मृत्यूदर आणखी कमी होत असल्याची माहिती डॉक्टर कमलापूरकर यांनी दिली.(Ratnagiri Rajapur taluka Corona free after six month)

संबंधित बातम्या : 

शहीद जवानाच्या आईवर मोफत शस्त्रक्रिया, रुग्णालयातील भावनिक व्हिडीओ व्हायरल, अशोक चव्हाणांकडून डॉक्टरांना शाबासकी

मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, दिवाळीच्या तोंडावर निर्णय, सर्वसामान्यांकडून स्वागत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.