रत्नागिरीत कोव्हिड योद्धे कोरोनाच्या कचाट्यात, पोलीस अधीक्षकांनंतर ZP सीईओही पॉझिटिव्ह
रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या सीईओंनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. Ratnagiri SP and CEO corona positive
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या सीईओंनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल काल संध्याकाळी प्राप्त झाला. त्यानंतर आता सीईओ होम क्वारंटाईन झाले आहेत. यानंतर आता जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅबदेखील घेतले जाणार आहेत. (Ratnagiri SP and CEO corona positive)
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 683वर पोहोचाला आहे. तर, जिल्हाधिकारी यांचे स्वॅबदेखील काल तपासणीकरता घेतले होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता 8 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, जिल्ह्यातील दोन बडे अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने, आता आरोग्य यंत्रणादेखील आणखी सतर्क झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 हजार 967 नमुने तपासणीकरता घेण्यात आले असून 9 हजार 808 अहवाल प्राप्त झाले आहेत. तर, 159 अहवाल प्रलंबित आहेत. (Ratnagiri SP and CEO corona positive)
ब्रेक द चेन
रत्नागिरी जिल्ह्यात ब्रेक द चेन पॅटर्नखाली कडक लॉकडाऊन सुरु झाला आहे. 18 लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढतेय. लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी एकाच दिवसात 47 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. सध्याची रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 683 वर पोहचली आहे. लॉकडाऊनच्या आधी रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या 599 होती. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 26 झाली आहे. म्हणजे 20 रुग्णांच्या मागे एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्य़ू होतोय. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामृत्यूचा दर 4 टक्क्याहून अधिक आहे.
संबंधित बातम्या
Ratnagiri Corona | रत्नागिरीत रात्रीतून 47 रुग्ण वाढले, पोलीस अधीक्षकही कोरोनाबाधित