चिपळूणमधील तिवरे धरण फुटले, पाच जणांचा मृत्यू, 24 हून अधिक बेपत्ता

गेल्या चार दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून 23 ते 24 जण बेपत्ता असल्याची भीती झाली आहे.

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले, पाच जणांचा मृत्यू, 24 हून अधिक बेपत्ता
Follow us
| Updated on: Jul 03, 2019 | 10:04 AM

रत्नागिरी : गेल्या चार दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. काल (2 जुलै) रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून 23 ते 24 जण बेपत्ता असल्याची भीती  व्यक्त केली जात आहे. तसेच धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली आहे. तर आजूबाजूच्या गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेले चार दिवस मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि इतर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे काल (2 जुलै) रात्रीच्या सुमारास तिवरे धरण ओव्हरफ्लो झाले होते. धरण फुटू शकते या भितीमुळे नागरिकांनी पाठबंधारे विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. त्यानंतर धरणाचे परीक्षण केल्यानंतर ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याचे पाठबंधारे विभागाने सांगितले.

मात्र त्यानंतर काही वेळाने धरण फुटले आणि गावात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच त्या गावातील दादर पूलही पाण्याखाली गेला असून धरण फुटल्याने वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळवल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफच्या पथकही घटनास्थळी रवाना झाले. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

तिवरे धरण फुटल्यामुळे ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या सात गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे जवळपास 22 ते 23 जण वाहून गेल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. त्याशिवाय पाण्याच्या प्रचंड वेगाने गावातील घरही वाहून गेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहे.

तसेच गावातील नागरिकांनी  तिवरे धरण हे 100 टक्क्यांपैकी केवळ 27.59 टक्केच भरले होते. त्यामुळे हे धरण गळतीमुळेच धरण फुटल्याचा आरोप केला आहे.

बेपत्ता असलेल्या लोकांची नावे

  1. अनंत हरिभाऊ चव्हाण (63)
  2. अनिता अनंत चव्हाण (58)
  3. रणजित अनंत चव्हाण (15)
  4. ऋतुजा अनंत चव्हाण (25)
  5. दुर्वा रणजित चव्हाण (1.5)
  6. आत्माराम धोंडू चव्हाण (75)
  7. लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)
  8. नंदाराम महादेव चव्हाण (65)
  9. पांडुरंग धोंडू चव्हाण (50)
  10. रवींद्र तुकाराम चव्हाण (50)
  11. रेश्मा रविंद्र चव्हाण (45)
  12. दशरथ रविंद्र चव्हाण (20)
  13. वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)
  14. अनुसिया सीताराम चव्हाण (70)
  15. चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)
  16. बळीराम कृष्णा चव्हाण (55)
  17. शारदा बळीराम चव्हाण (48)
  18. संदेश विश्वास धाडवे (18)
  19. सुशील विश्वास धाडवे (48)
  20. रणजित काजवे (30)
  21. राकेश घाणेकर(30)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.