कोकण रेल्वे मार्गावर विचित्र अपघात, चालत्या रो-रो गाडीवरील ट्रक खाली पडला, चालकाने प्रसंगावधानाने वाचला जीव

खेड ते करंजाडेदरम्यान चालत्या रो-रो गाडीवरील ट्रक खाली पडल्याने विचित्र घटना घडली.

कोकण रेल्वे मार्गावर विचित्र अपघात, चालत्या रो-रो गाडीवरील ट्रक खाली पडला, चालकाने प्रसंगावधानाने वाचला जीव
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 11:43 AM

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर आज पहाटे एक विचित्र अपघात घडला (Truck Collapsed). खेड ते करंजाडेदरम्यान चालत्या रो-रो गाडीवरील ट्रक खाली पडल्याने विचित्र घटना घडली. ही घटना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. रो-रो सेवा म्हणजे रेल्वेच्या वॅगनवरुन ट्रकची ये-जा केली जाते (Truck Collapsed).

सुदैवाने ट्रकमधील चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच खाली उडी मारल्यामुळे जीव वाचला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी रो-रो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान दिवाणखवटीपासून एक किलोमीटर अंतरावर आली असता रो-रोवरील एक ट्रक अचानक खाली पडला. काही अंतरावर ट्रकला हादरे बसत होते. त्यामुळे ट्रकमधील चालकाने खाली उडी मारली. वेगाने जाणाऱ्या गाडीवरुन कोसळलेल्या ट्रकचा चुराडा झाला. यामध्ये ट्रेनचा मधला भाग रुळावरुन खाली उतरला.

सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. खाली पडलेल्या ट्रकमध्ये लोखंडी प्लेट होत्या. हा प्रकार झाल्यानंतर गाड्या त्या-त्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. कोकण कन्या आणि मांडवी या दोन गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. हा प्रकार घडल्यानंतर अपघात रिलिफ व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. रुळावरुन खाली आलेल्या रोरोचा भागवर आणला गेला.

यासाठी सुमारे दोन तासाचा कालावधी लागला. पहाटे चारच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार कसा घडला याची चौकशी सुरु झाली असून कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत.

खाली पडलेला ट्रक योग्य पद्धतीने बांधला नसावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हादरे बसून तो खाली पडला असावा. अन्यथा वेल्ड फेल्युअर मुळे रोरोचा भाग खाली उतरल्याने हा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत चौकशी सुरु झाली आहे.

Truck Collapsed

संबंधित बातम्या :

भाजप नेत्या रिटा बहुगुणा यांच्या नातीचा फटाके फोडताना अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

वर्ध्यात पोलिसांची गाडी भररस्त्यात पलटी, तीन पोलिसांसह पाच जण गंभीर जखमी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.