Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक
आम्ही कोणत्याही प्रकारची दगडफेक केली नाही, असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. याठिकाणी फक्त घोषणाबाजी करून आंदोलन करत आहोत. तरीही आमच्यावर चुकीचा आरोप केले गेलेत. त्यामुळं अमरावतीतील शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांनी बॅरिकेट्स तोडून राणांच्या निवासस्थानी कूच केली. पण, पोलीस बंदोबस्त असल्यामुळं त्यांना अडविण्यात आलं.
अमरावती : आमदार रवी राणा यांनी नुकतचं आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं. तत्पूर्वी त्यांनी अमरावती येथील घरासमोर शिवसैनिकांनी दगडफेकी केली असल्याचा आरोप केला. यावरून अमरावती येथे त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत असलेले शिवसैनिक (Shiv Sainik) अधिकच आक्रमक झालेत. आम्ही कोणत्याही प्रकारची दगडफेक केली नाही. याठिकाणी फक्त घोषणाबाजी करून आंदोलन करत आहोत. तरीही आमच्यावर चुकीचा आरोप केले गेलेत. त्यामुळं अमरावतीतील शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांनी बॅरिकेट्स तोडून राणांच्या निवासस्थानी (Rana’s residence) कूच केली. पण, पोलीस बंदोबस्त (Police coverage) असल्यामुळं त्यांना अडविण्यात आलं.
शिवसैनिकांचा तीन तास ठिय्या
सुमारे तीन तासांपूर्वी शिवसैनिक राणांच्या घरासमोर आले. ते लपून का पळून गेले, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. शिवाय अमरावतीचे शिवसैनिक समर्थ आहेत. राणा दाम्पत्य पळपुटे आहेत. ते राजकीय स्टंटबाजी करतात, असाही आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. सुमारे दोन-अडीचशे कार्यकर्ते सुमारे तीन तास ठाण मांडून बसले होते. राणा दाम्पत्यांविरोधात घोषणाबाजी देत होते.
दिवसभर तणावाचे वातावरण
सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार, अशी घोषणा राणा दाम्पत्यानं केली होती. काल राणांचे कार्यकर्ते मुंबईसाठी निघणार होते. परंतु, रवी राणा यांनी आवाहन केल्यामुळं कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले नाही. तरीही अमरावतीचे शिवसैनिक आक्रमक झाले होते. रातोरात्र राणा दाम्पत्य मुंबईला पळाल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईला मातोश्रीवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सामोरे जा, असं अमरावतीच्या शिवसैनिकांचं म्हणण होतं. राणा दाम्पत्यानं सकाळी नऊ वाजता मुंबई येथील घरातून निघण्याचा प्रयत्न केला. पण, तिथं पोलिसांनी त्यांना सुरक्षेचं कारण सांगून बाहेर जाऊ दिलं नाही. शिवसेनेचे कार्यकर्तेही मुंबईत राणा यांच्या घरासमोर आक्रमक झाले होते.