रवींद्र जाडेजाची चपळाई टीम इंडियाच्याच अंगाशी, 13 वेळा साथीदार रनआऊट

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सिडनी कसोटीमध्ये 8 जानेवारीला क्षेत्ररक्षण करताना कमाल केली होती. त्याने अप्रतिम थ्रोवर स्टिव्ह स्मिथला धावबाद करुन भारताला मोठी विकेट मिळवून दिली होती.

रवींद्र जाडेजाची चपळाई टीम इंडियाच्याच अंगाशी, 13 वेळा साथीदार रनआऊट
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 8:55 AM

सिडनी : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) सिडनी कसोटीमध्ये 8 जानेवारीला क्षेत्ररक्षण करताना कमाल केली होती. त्याने अप्रतिम थ्रोवर स्टिव्ह स्मिथला धावबाद करुन भारताला मोठी विकेट मिळवून दिली होती. परंतु 9 जानेवारीला जेव्हा जाडेजा फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्यामुळे भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले. जाडेजासोबत भागिदारी करण्यासाठी मैदानात आलेल्या रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह हे दोघेजण धावबाद झाले. (Ravindra Jadeja involves in 20 run outs in his test careet)

जाडेजाने अश्विनसोबत एक धाव चोरण्याच्या प्रयत्न केला होता, परंतु ते खूपच अवघड होते. पॅट कमिंसच्या लक्षात आलं होतं की, अश्विन जाडेजाच्या तुलनेत थोडा हळू धावतो. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियन विकेटकीपरकडे थ्रो करुन अश्विनला धावबाद (रनआऊट) केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह मैदानात आला. जाडेजाने एक चेंडू स्क्वेयर लेगच्या दिशेने मारला आणि बुमराहला एक धाव घेण्याचा इशारा केला. परंतु यावेळी मार्नस लाबूशेनने बुमराहला धावबाद केलं. असं पहिल्यांदाच झालेलं नाही. जाडेजाने यापूर्वीदेखील अनेक साथीदारांना अशाच पद्धतीने धावबाद केलं आहे. मेलबर्न कसोटीत त्याने कर्णधार रहाणेला असंच धावबाद केलं होतं.

73 डावांमध्ये 20 जण रनआऊट

रवींद्र जाडेजा त्याच्या 73 कसोटी डावांमध्ये एकूण 20 वेळा रनआऊटमध्ये सहभागी झाला आहे. 13 वेळा त्याने त्याच्या जोडीदाराला आऊट केलं आहे. तर इतर 7 वेळा तो स्वतः रनआऊट झाला आहे. याची सरासरी काढायची झाल्यास 3.5 प्रतिडाव असं उत्तर येईल. यायाच अर्ध 3-4 डावांमध्ये जाडेजामुळे एकदा तरी त्याचा साथीदार रनआऊट होतो अथवा तो स्वतः तरी रनआऊट होतो. याचं प्रमुख कारण जाडेजा खूप जलद धावतो, परंतु त्याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार त्याच्याइतका जलद धावू शकत नाही.

दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेबाहेर

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. सिडनी कसोटीत फलंदाजी करताना रवींद्र जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं निदान झालं आहे. यामुळे जाडेजाची चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची चिन्ह आहेत. दरम्यान याबाबत बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

PTI दिलेल्या वृत्तानुसार, दुखापतीनंतर जाडेजाच्या बोटाचं स्कॅन करण्यात आलं. यामध्ये अंगठ्याचं हाड सरकरल्याचं निदान झालं आहे. तसेच फ्रॅक्चरही झालं आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या सू्त्रांनुसार सांगितले की, जाडेजाला या दुखापतीमुळे हातात ग्लोवज घालून फलंदाजी करण्यास त्रास होत आहे.” यामुळे जाडेजाचं चौथ्या कसोटीला मुकण्याची तीव्र शक्यता आहे. या दुखापतीमुळे जाडेजाला किमान 3-4 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते.

हेही वाचा 

 सिडनीत रडीचा डाव, दारु पिऊन बुमराह, सिराजला शिव्या, भारताकडून तक्रार

‘दस का दम’, डेव्हिड वॉर्नरला बाद करत अश्विनची विक्रमी कामगिरी

(Ravindra Jadeja involves in 20 run outs in his test careet)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.