Goa Corona | कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, 18 नवे रुग्ण

मजुरांना घेऊन जाणारी दिल्ली-थिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस राज्यात न थांबवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे.

Goa Corona | कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, 18 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 7:59 PM

गोवा : कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाने (Re-Entry Of Corona In Goa) एन्ट्री घेतली आहे. गोव्यात 18 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गोव्यात आढळेल्या नव्या रुग्णांमध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे काही प्रवासी असल्याचं  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे मजुरांना घेऊन जाणारी दिल्ली-थिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस राज्यात न थांबवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला. कोरोनामुक्त असलेल्या गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ नये म्हणून ही खबरदारी (Re-Entry Of Corona In Goa) घेतली जात आहे.

“सध्या राज्यात कोरोनाचे 18 रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण राज्यात प्रवेश करत इतर लोकांमध्ये जाण्यापूर्वीच सापडले आहेत”, असं प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

“राजधानी ट्रेनने प्रवास करणारे अनेक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोव्यात या ट्रेनला थांबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून मडगाव रेल्वे स्थानकावर ही ट्रेन थांबणार नाही”, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

राजधानी एक्स्प्रेसने शनिवारी 280 तर रविवारी 368 प्रवासी गोव्यात पोहोचले (Re-Entry Of Corona In Goa), असल्याचं सावंत यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी थिरुअनंतपुरम ते दिल्लीदरम्यान धावणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस मात्र मडगाव रेल्वे स्थानकावर थांबेल असं त्यांनी सांगितलं आहे.

“निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील एकही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याचं समोर आलं आहे. सोबतच मडगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्याही फार कमी आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून रेड झोनमधून येणाऱ्या सर्व ट्रक चालकांची तपासणी केला जाणार असल्याचंही प्रमोद सावंत यांनी (Re-Entry Of Corona In Goa) सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख

मुंबईहून साताऱ्याला आलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू, आई-वडील चार दिवस मुलाच्या मृतदेहासोबत राहिले

Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घट

लॉकडाऊनमध्ये कोकणच्या पोरांची आयडिया, ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.