रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?

बाळ बोठे हनी ट्रॅप सीरिजमध्ये काय छापत होता. गळाला न लागणारे मासेही कसे जाळ्यात यायचे? वाचा स्पेशल रिपोर्ट

रेखा जरे हत्याकांड :  बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं 'मटेरियल' वाचलंत?
रेखा जरे बाळ बोठे
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 1:22 PM

मुंबई/अहमदनगर : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडात (Rekha Jare Murder Case) मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) सध्या फरार आहे. मात्र, त्याने वर्तमानपत्रात चालवलेल्या हनी ट्रॅपवरील सीरिजची चर्चा जोरात आहे. शहरात सुरु असणाऱ्या हनी ट्र्रॅपची माहिती बाळ बोठेला कशी मिळत होती, याचा तपास अद्याप लागलेला नाही. मात्र, कुठंतरी पाणी मुरत होतं हे नक्की. अगदी व्यक्तींच्या नावासह, घटनांसह आणि वक्तव्यांसह तो आपल्या या सीरिजमध्ये सगळं छापत होता. बाळ बोठे या सीरिजमध्ये नेमकं काय छापत होता. असं काय लिहिलं जायचं, की गळाला न लागणारे मासेही जाळ्यात यायचे? याची सगळी बित्तंबातमी देणारा हा स्पेशल रिपोर्ट. (Rekha Jare Murder Case Bal Bothe Honey Trap Jyoti)

बुलाती है, मगर जाने का नही

“हनी ट्रॅप : बुलाती है, मगर जाने का नही…नगरच्या ‘ज्योती’चा पुण्या-मुंबईत जलवा….” या हेडलाईनखाली बाळ बोठेने एक लेख छापला. यामध्ये नगरमधील एक महिला, जिला त्याने ज्योती असं नाव दिलं, ती कशाप्रकारे आपले सावज हेरते आणि त्यांना लुटते याची कहाणी त्याने लिहली.

काय होता लेख?

विविध क्षेत्रांतील ‘वजनदार’ आणि धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ची नगरमध्ये लावलेली ‘ज्योत’ चांगलीच ‘तेवत’ आहे. मात्र, तिच्या विखारी तेजामुळे अनेकांचे कौटुंबिक वातावरण काळवंडत आहे. नगर जिल्हा पादाक्रांत केल्यानंतर या ‘ज्योती’ने आपले ‘अनोखे रुप’ दाखवत औरंगाबाद, नाशिक, सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील ‘बाजारपेठ’ही काबीज केली. आता तर ‘ज्योती’चा जलवा थेट पुण्या-मुंबईपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मंत्रालयाच्या केवळ दारात न स्थिरावता तेथील काही मजले ‘ज्योती’ने आपल्या कवेत घेतले आहेत.

या सगळ्या लेखात एक नाव प्रकर्षानं येते, ते नाव म्हणजे सागर भिंगारदिवे… रेखा जरे हत्याकांडातील एका आरोपीचं नावही सागर भिंगारदिवेच आहे. मात्र, या लेखात तो सागर भिंगारदिवे हे नाव अप्रत्यक्षरित्या घेत, त्याला या सगळ्यातील एजंट म्हणतो…सागर भिंगारदिवे हा नगरजवळीलच केडगावचा राहणारा आहे आणि रेखा जरे हत्याकांडात तो आरोपी आहे.

भिंगारदिवेंच काम काय?

टोळीच्या या म्होरक्‍यांपैकी एकाने ‘भिंगार’चे ‘दिवे’ पाजळत ‘सागर’तळ ढवळला. या म्होरक्‍याचेही अनेक उद्योग आहेत. हनी ट्रॅपसाठी ‘बकरा’ शोधणे, त्यांच्या ‘कार्यक्रमा’ची वेळ आणि ठिकाण ठरवणे, बकरा पटवण्यासाठी संबंधित महिलांना अश्‍लील व्हिडिओ उपलब्ध करुन देणे, संभाषणाच्या ‘ट्रिक’ सांगणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ‘सागर’तळ ढवळत पार पाडल्या जातात.

या हत्याकांडाचा शोध लावताना पोलिसांनी बाळ बोठेने लिहिलेले लेखही वाचणं गरजेचं आहे, कारण यात अनेक पुरावे असण्याची शक्यता दाट आहे.

नगरमधील ‘देव’माणूस

नगरमध्ये हनी ट्रॅप… पोलिस अधिकारी, व्यापारी, धनिकही प्रेम”जाळ्या”त… अशा हेडलाईनखाली त्याने हा लेख छापला. या लेखात त्यानं नाव न घेता एका प्रतिष्ठित व्यक्तीचा उल्लेख केला.

नगरमधील एक ‘देव’माणूस ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या टोळीच्या कचाट्यात ‘दत्त’ म्हणून सापडला. टोळीच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मामी’च्या मोहजालात शिरकाव केल्यानंतर या ‘देवा’ला नगर शहराजवळील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे ‘योग्य’ वेळ येताच ‘मामी’च्या सांकेतिक इशाऱ्यानुसार ‘टीम ब्लॅकमेलर’ हजर झाली. ‘देव’माणसाची प्रारंभी धुलाई करुन त्याच्यावर दहशत निर्माण करण्यात आली. ‘त्या’ घटनेचे लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर ‘देव’माणसाचा कबुलीजबाब वजा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्याच्या गळ्यातील सुमारे तीन लाखांची सोनसाखळी आणि रोख रक्कम तर घेतलीच; शिवाय ‘ऑन द स्पॉट’ त्याच्याकडून पाच लाखांची अतिरिक्त वसुलीही करण्यात आली. (Rekha Jare Murder Case Bal Bothe Honey Trap Jyoti)

या लेखातून बाळ बोठेने हनी ट्रॅपचा धंदा कसा फोफावत आहे, आणि त्याला समाजातील बडे अधिकारी, राजकारणी कसे बळी पडलेत याची पोलखोल केली. या पोलखोलीनंतर या टोळ्यांकडून पत्रकारांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही तो यात म्हणतोय.

मुंबईतील ‘डॅडी’-‘मम्मी’चीही मदत

लेखांची मालिका सुरु केल्यानंतर विविध क्षेत्रांतील महिलांना किंवा भाडोत्री महिलांना पुढे करुन विनयभंग, बलात्काराचे गुन्हे नोंदवण्याची व्यर्थ धडपड टोळीने चालवल्याचे समजते. हे नाही जमले तरी किमान म्होरक्‍या अथवा त्याच्या समर्थकांमार्फत “अॅट्रॉसिटी’चा गुन्हा अथवा अपघात घडवून आणण्याचा पर्याय निवडायचा, असेही दिसत आहे. गरज पडल्यास मुंबईतील ‘डॅडी’ अथवा ‘मम्मी’चीही मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

बाळ बोठेला ही माहिती कुठून मिळत होती, त्याचा खबऱ्या कोण होता? हनी ट्रॅपच्या प्रकरणाची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत आणि त्यात कुणाकुणाचा हात आहे? बाळ बोठेने यात फायदा करुन घेतला की कोळश्याच्या धंद्यात त्याचेही हात काळे झाले. हे तपासणं आता जास्त गरजेचं आहे. त्यासाठी बाळ बोठेने सुरु केलेली ही मालिका बारकाईने वाचणं, आणि त्यातील संबंधित व्यक्तींपर्यंत पोहचून तपास करणं जास्त गरजेचं आहे. कदाचित यातून आणखी मोठं सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पण सध्या तपासाचा रोख दुसऱ्याच दिशेनं असलेला पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

जरे यांच्या घरात बोठेविरुद्ध लिहिलेले पत्र सापडलं; मोठा खुलासा होण्याची शक्यता

जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?

(Rekha Jare Murder Case Bal Bothe Honey Trap Jyoti)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.