ज्यांचा पगार 30 हजारांच्या खाली, त्यांना दोनवेळा पगार; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अंबानींचं दिलदार पाऊल

कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील कंपन्या ठप्प झाल्या आहेत (Reliance to pay twice salary during Corona).

ज्यांचा पगार 30 हजारांच्या खाली, त्यांना दोनवेळा पगार; कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अंबानींचं दिलदार पाऊल
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 7:46 PM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील कंपन्या ठप्प झाल्या आहेत (Reliance to pay twice salary during Corona). अशावेळी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्सने देखील अशाचप्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांवर कोणताही आर्थिक ताण येऊ नये म्हणून रिलायन्सने मासिक वेतन 30 हजार रुपयांहून कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील काळात दुप्पट वेतन देण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्सने म्हटलं आहे, “मासिक वेतन 30 हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना या महिन्यात दुप्पट वेतन दिलं जाईल. यामागे त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहावेत आणि त्यांच्यावरील आर्थिक भार कमी व्हावा असा उद्देश आहे.”

रिलायन्सने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, “या अटीतटीच्या काळात भारतातील नागरिकांना एकमेकांपासून अंतर राखत असतानाच आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी जोडून राहणं महत्त्वाचं आहे. आमच्या कंपनीचे बहुतेक सर्व कर्मचारी घरुन काम करत आहेत. याला जीओ नेटवर्कमध्ये महत्त्वाच्या कामावर असणारे कर्मचारी अपवाद आहेत. ते या काळात 40 कोटी जिओ ग्राहकांना सेवा पुरवत आहेत.”

जेथे जेथ शक्य आहेत तेथे तेथे आम्ही लवकरच जिओ फायबरची (10 एमबीपीएस) सुरुवात करत आहोत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या काळात त्यावर कोणताही सेवाकर असणार नाही. जिओ नागरिकांना घरी वापरावयाचे रावटर्स देखील कमीतकमी परतावा रकमेत उपलब्ध करुन देईल, असंही रिलायन्सकडून सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या :

80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Corona | नवरा-नवरी लॉकडाऊन, कोरोनामुळे ऑनलाईन विवाह

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा

Reliance to pay twice salary during Corona

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.