“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

"मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता" असा टोला रेणुका शहाणे यांनी लगावला.

उचलली जीभ... मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 8:00 AM

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिक अभिनेत्री कंगना रनौतविषयी चीड व्यक्त करत आहेत. प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही कंगनाविषयी संताप व्यक्त केला. “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असं म्हणत त्यांनी कंगनाला मराठीतूनही सुनावलं. (Renuka Shahane slams Kangana Ranaut on her tweet comparing Mumbai with PoK)

“प्रिय कंगना, मुंबई हे असे शहर आहे, जिथे बॉलिवूड स्टार होण्याचे तुझे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे या अद्भुत शहराबद्दल आदरभाव ठेवण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे. पाकव्याप्त काश्मीरसोबत तू मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असे लिहित रेणुका यांनी संताप दाखवणारा इमोजीही पोस्ट केला आहे.

रेणुका शहाणेंच्या ट्वीटला कंगनाने तात्काळ उत्तरही दिले. “प्रिय रेणुकाजी, सरकारच्या कमकुवत कारभारावर केलेली टीका त्या शहरावरील टीका कधीपासून मानली जाऊ लागली? मला वाटत नाही की आपण इतक्या भोळ्याभाबड्या आहात. आपणसुद्धा रक्तासाठी तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होतात? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या” असे कंगनाने लिहिले आहे.

(Renuka Shahane slams Kangana Ranaut on her tweet comparing Mumbai with PoK)

कंगनाच्या उत्तराला रेणुका शहाणे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिल्याने ट्विटर वॉर रंगल्याचे चित्र आहे. “प्रिय कंगना, मी सरकारवर टीका करण्यास हरकत घेत नाही. पण “मुंबई पीओकेसारखी का वाटत आहे” ही मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटतं. ही तुलना खरोखर खूप वाईट होती. मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता” असा टोला रेणुका शहाणे यांनी लगावला.

काय आहे प्रकरण ?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता.

ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.

संबंधित बातम्या :

“कंगनाचे अख्खे करिअर कंपूशाहीवर आधारित” नगमाच्या आरोपांनंतर सोशल मीडियावर जुगलबंदी

‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, मग बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

रणवीर, रणबीर, विकी आणि अयानने ड्रग्ज टेस्टमध्ये निर्दोषत्व सिद्ध करावे, कंगनाचे चॅलेंज

(Renuka Shahane slams Kangana Ranaut on her tweet comparing Mumbai with PoK)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.