Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Case to CBI | तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच; रिया सीबीआय चौकशीस तयार, वकिलांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाने घटनेची सत्यता आणि वस्तुस्थिती पाहून, मुंबई पोलिसांच्या तपासाचा रिपोर्ट पाहून केस सीबीआयकडे दिली आहे" असे मानेशिंदे म्हणाले.

SSR Case to CBI | तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच; रिया सीबीआय चौकशीस तयार, वकिलांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 2:54 PM

मुंबई : सुप्रीम कोर्टाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिया सीबीआयच्या तपासाला सामोरं जायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Rhea Chakraborty Adv Satish Maneshinde Reaction on Supreme Court transfering Sushant Singh Rajput Death Case to CBI)

“खरं तर सीबीआयकडे तपास द्यावा, अशी मागणी सुरुवातीला खुद्द रियाने मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने घटनेची सत्यता आणि वस्तुस्थिती पाहून, मुंबई पोलिसांच्या तपासाचा रिपोर्ट पाहून केस सीबीआयकडे दिली आहे” असे मानेशिंदे म्हणाले.

“या प्रकरणात दोन राज्य एकमेकांवर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप करत होते. या पार्श्वभूमीवर न्याय होण्याच्या दृष्टिकोनातून ही केस सीबीआयकडे पाठवण्यात आली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 142 नुसार सीबीआयला तपास करण्याचा अधिकार आहे, यामुळे ही केस सीबीआयकडे पाठवण्यात आली आहे.” असेही सतीश मानेशिंदे म्हणाले.

“रियाने यापूर्वी मुंबई पोलीस, ईडी यांच्या तपासाला तोंड दिलं आहे, सहकार्य केलं आहे, त्याचप्रमाणे सीबीआयच्या चौकशीलाही ती समोर जायला तयार आहे. तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही” असं रियाचं म्हणणं असल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं आहे.

दरम्यान, सीबीआयचे जॉइंट डायरेक्टर मनोज शशिधर (गुजरात कॅडरचे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी), एसआयटीची दुसरे सदस्य डीआयजी गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद अशी सीबीआयची टीम उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे. (Rhea Chakraborty Adv Satish Maneshinde Reaction on Supreme Court transfering Sushant Singh Rajput Death Case to CBI)

सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी सापडला होता. सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिस कारवाई करत असताना त्याच्या वडिलांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सत्यमेव जयते ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात

मुंबई पोलिसांविरोधात षडयंत्र, सीबीआय तपासाच्या निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

पार्थ पवारांची मागणी आजोबांना आवडली का, यावर बोलणार नाही, पण… : देवेंद्र फडणवीस

(Rhea Chakraborty Adv Satish Maneshinde Reaction on Supreme Court transfering Sushant Singh Rajput Death Case to CBI)

बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?.
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल
बारमध्ये डान्स अन् हातात रायफल... PSI रणजीत कासलेंचा व्हिडीओ व्हायरल.
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?
मालवणच्या राजकोटवरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?.
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत
राणे पक्षातून गेल्यावर गद्दार हा शब्द बाळासाहेबांनीच आणला - संजय राऊत.
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट
पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट.
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे
'..असा पोरकटपणा फक्त उबाठाचे लोकच करू शकतात'; बावनकुळेंनी ओढले ताशेरे.
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?
मुंबईत पुन्हा मराठी कुटुंबाचा अपमान; काय म्हणाले संदीप देशपांडे?.
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.