ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर?

रिया चक्रवर्तीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि सिमॉन खंबाटा या तिघींची नावे दिल्याची माहिती आहे

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर?
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 11:17 AM

मुंबई : ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावं समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावं एनसीबीच्या चौकशीत आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने घेतल्याचा दावा केला जात आहे. (Rhea Chakraborty names Sara Ali Khan Rakul Preet Singh in Bollywood Drugs Connection)

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील 25 कलाकारांची यादी दिल्याची धक्कादायक माहिती आहे. यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि सिमॉन खंबाटा या तिघींची नावे असल्याचा आरोप आहे. या तिघींना ‘एनसीबी’ समन्स बजावण्याची शक्यता आहे.

रियाने एनसीबीला दिलेल्या 19 पानी निवेदनात विशेषत: सारा, रकुल आणि सिमॉन या तिघींची नावे दिल्याचा दावा आहे. या प्रकरणात 25 ए ग्रेड बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेण्यात आली आहेत, ज्यात अभिनेते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊस आणि इतरांचा समावेश आहे. एनसीबी आता अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील ए, बी आणि सी ग्रेड कलाकारांवर लक्ष केंद्रित करण्याची चिन्हं आहेत.

सारा अली खानने सुशांतसिंह राजपूत याच्यासोबत ‘केदारनाथ’ चित्रपटात काम केलं होतं. सारा ही सुशांतला आपला मार्गदर्शक मानत असल्याचंही म्हटलं जात होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने सोशल मीडियावर भावूक पोस्टही शेअर केली होती. ‘सिम्बा’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या साराने मोजक्याच चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात भूमिका केल्या आहेत. ‘अय्यारी’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तर अजय देवगनसोबत दे दे प्यार दे, मरजांवा असे काही चित्रपट केले आहेत. तर सिमॉन खंबाटा ही बॉलिवूडची सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. (Rhea Chakraborty names Sara Ali Khan Rakul Preet Singh in Bollywood Drugs Connection)

संबंधित बातम्या :

मी निरपराध, मला या गुन्ह्यात गुंतवण्यात आलंय, रियाकडून 19 पानांचा जामीन अर्ज

सुशांतसिंह राजपूत जिवंत असता, तर तुरुंगात असता का? : तापसी पन्नू

(Rhea Chakraborty names Sara Ali Khan Rakul Preet Singh in Bollywood Drugs Connection)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.