अतिवृष्टी, पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, केरोसिन मोफत मिळणार

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपादग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे.

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, केरोसिन मोफत मिळणार
Follow us
| Updated on: Aug 10, 2019 | 8:37 AM

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे (Sangli Flood) मोठ्या प्रमाणात कुटुंबं निराधार झाली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपातग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात अन्नधान्य व केरोसिन वाटपाचे काम शासनातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.

अतिवृष्टीमुळे उद्‍भवलेल्या आपातकालीन परिस्थितीमुळे 2 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडाल्यामुळे निराधार होणा-या कुटुंबांना अन्नधान्य वाटपाची कार्यपद्धती अन्न व नागरी पुरवठा विभागाने एका परिपत्रकाद्वारे निश्चित केली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केल्यानंतर पूरबाधीत कुटुंबांची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी या सर्व आवश्यक बाबी जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर गोदामात शिल्लक असलेल्या साठवणुकीतून तात्काळ वाटप सुरु करण्यात येणार आहे.

अन्न धान्याची अतिरिक्त मागणी असल्यास शासनामार्फत तात्काळ पुरवठा करण्यात येईल. यासाठीही भारतीय अन्न महामंडळाकडून अन्नधान्याची उचल करुन वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे, अशा स्पष्ट सूचना विभागामार्फत संबधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

10 हजारांची तात्पुरती मदत

सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणावर लोकांना बसल्याने शासनाने तात्पुरती 10 हजार रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील पूरपरिस्थिती जाणून घेऊन नुकसान भरपाई देण्यात येईल. असेही सहकारमदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केले आहे. 

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.