लॉकडाऊनमुळे पुण्यात रस्ते अपघात घटले, एप्रिलमध्ये केवळ 3 अपघात, बळींचा आकडा…

महाराष्ट्रात दरवर्षी एक्सप्रेस वे वर किंवा मोठ्या द्रुतगती मार्गांवर (Road Accident Decrease Due Corona Lockdown) अपघात होत असतात.

लॉकडाऊनमुळे पुण्यात रस्ते अपघात घटले, एप्रिलमध्ये केवळ 3 अपघात, बळींचा आकडा...
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 11:39 AM

पुणे : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला (Road Accident Decrease Due Corona Lockdown)  आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरातील अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटलं आहे. गेल्या तीन वर्षातील मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा अपघातात घट झाली आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी एक्सप्रेस वे वर किंवा मोठ्या द्रुतगती मार्गांवर (Road Accident Decrease Due Corona Lockdown) अपघात होत असतात. रस्ते अपघात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाणही घटले आहे.

पुणे शहरात मागील तीन वर्षातील मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या तुलनेत यंदा अपघात आणि मृत्यूचे प्रमाण घटलं आहे. पुण्यात मार्च महिन्यात 30 अपघात झाले आहेत. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 43 जण जखमी झाले आहेत. मात्र त्या तुलनेत एप्रिल महिन्यात केवळ 3 अपघात झाले आहेत. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.

पुणे शहरात असणाऱ्या संचारबंदीमुळे प्रमाण कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. दरम्यान पुण्यात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 33 हजार वाहन जप्त करण्यात आली आहेत.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

पुणे शहरात काल दिवसभरात 122 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1339 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात 79 कोरोनाग्रस्त रुग्ण दगावले आहेत. 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 73 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ॲक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1057 आहे.

राज्यात 729 नवे रुग्ण 

राज्यात काल (28 एप्रिल) दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 हजार 318 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली (Road Accident Decrease Due Corona Lockdown) आहे.

संबंधित बातम्या : 

गुड न्यूज! पुण्यात चार महिन्याच्या चिमुरड्याची कोरोनावर मात

जळगावात सात नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 31 वर

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.