औरंगाबादेत वाहतूक कोंडीचा कहर, तब्बल 13 तास ट्रॅफिक जॅम, मुसळधार पावसाने 15 किमीपर्यंत रांगा
औरंगाबादमधील कन्नड घाटात प्रचंड वाहतूक कोंडीचा कहर झाला आहे. मागील 13 तासापासून वाहनं आहेत त्याच जागेवर थांबलेली आहेत (Big Traffic Jam in Aurangabad ).
औरंगाबाद : औरंगाबादमधील कन्नड घाटात प्रचंड वाहतूक कोंडीचा कहर झाला आहे. मागील 13 तासापासून वाहनं आहेत त्याच जागेवर थांबलेली आहेत (Big Traffic Jam in Aurangabad ). रात्री 8 वाजल्यापासून ट्रॅफिक जाम आहेत. वाहनांच्या रस्त्यावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमधील मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाले आणि त्यातूनच ही वाहतूक कोंडी झाली.
या परिसरात रस्त्याचं काम सुरु होतं. त्यातच मुसळधार पाऊस झाल्याने कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाला. त्यामुळे वाहनांना तेथून पुढे निघणंही अवघड झालं. काही वाहनांनी चिखलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही वाहनं त्या चिखलातच फसली. त्यामुळे रस्ताही बंद झाला. चाळीसगाव-धुळे या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यातच रात्री 8 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाल्याने सर्व वाहनं जिथल्या तिथं अडकली आहेत.
दरम्यान, मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केल्यापासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी काहीशी विश्रांती घेऊन पावसाने दमदार हजेरी लावणं सुरुच ठेवलं आहे. औरंगाबादमध्ये तर पहिल्याच पावसात जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेण्यांजवळी धबधबे सुरु झाले आहेत. धबधब्यांच्या बॅक वॉटर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वेरुळ लेणीतील नर आणि मादी धबधबे आणि अजिंठा लेणीतील वाघूर धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे (Aurangabad Verul Ajantha Waterfall).
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये पहिल्याच पावसात अजिंठा आणि वेरुळचे धबधबे सुरु, कोल्हापूरमध्येही दमदार पाऊस
संबंधित व्हिडीओ:
Big Traffic Jam in Aurangabad