मुंबईत मिठाई देतो सांगून व्यापाऱ्याला लुटलं, दोघांना अटक, तर एक चोर धारदार चॉपर दाखवून फरार

मिठाई देतो असं सांगून मुंबईत चक्क एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडलीय.

मुंबईत मिठाई देतो सांगून व्यापाऱ्याला लुटलं, दोघांना अटक, तर एक चोर धारदार चॉपर दाखवून फरार
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 12:47 AM

मुंबई : दिवाळीचा सण आहे आणि सध्या मिठाईची मोठी मागणी आहे. लोक प्रेमापोटी एकमेकांना मिठाई देतात. मात्र, मिठाई देतो असं सांगून मुंबईत चक्क एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडलीय. या लुटारुंनी व्यापाऱ्याला लुटून भररस्त्यात लोकांना आणि पोलिसांना धारदार चाकू दाखवला. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि नागरिकांच्या सहकार्याने 2 चोरांना अटक करण्यात यश आलं आहे. चाकू दाखवणारा चोर मात्र फरार झालाय (Robbery in traders home on the name of sweet distribution in Mumbai).

या घडलेल्या प्रकरणावर कुणाचाही लगेच विश्वास बसणार नाही. पण मुंबईच्या जोगेश्वरी भागात हा प्रकार घडला. जोगेश्वरी रेल्वे स्टेशनजवळ एका व्यापाऱ्याच्या घरात 3 जण अचानक शिरले. त्यांनी व्यापाऱ्याला दिवाळीसाठी मिठाई देतो असं सांगून व्यापाऱ्याच्या घरात प्रवेश केला. तसेच घरात असलेल्या 2 महिला आणि व्यापाऱ्याला देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोन्याची चैन घेऊन पळ काढला.

पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी आरडा-ओरडा केला. लोकांचा आवाज ऐकू तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्या 3 चोरांपैकी दोघांना पकडले, अशी माहिती जोगेश्वरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नर्लेकर यांनी दिली.

या प्रकरणात एका आरोपी आपण पकडले जाणार या भितीने त्याच्याजवळ असलेला चॉपर काढून हवेत फिरवू लागला. त्यामुळे तो तेथून फरार झाला. मात्र, पोलिसांनी इतर दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 1 देशी कट्टा, 1 जिवंत काडतुस आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास जोगेश्वरी पोलीस करत आहेत. आरोपी कोण आहेत, ते नेमके त्याच व्यापऱ्याच्या घरात का घुसले? याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी सणासुधीच्या दिवसात मिठाई देणाऱ्यांपासून किंवा इतर कुठलंही प्रलोभन देणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय.

हेही वाचा :

एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेली व्हॅन पळवली, व्हॅन चालकानेच 4 कोटींवर डल्ला मारल्याचा अंदाज

लोखंडी रॉडने गॅरेज चालकाची हत्या करुन कार पळवली; 20 दिवसांतील हत्येची दुसरी घटना

घराच्या छतावर दोन बॅगा सापडल्या, 40 लाखांचे रोकड-दागिने पाहून कुटुंब अवाक

Robbery in traders home on the name of sweet distribution in Mumbai

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.