रोहित पवारांना ‘अव्वल’ आणण्यासाठी मातोश्रींनी कंबर कसली, सुनंदा पवार कर्जत-जामखेडच्या मैदानात

जामखेड-कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षण स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यात प्रबोधनाचे काम सुनंदा पवार करत आहेत

रोहित पवारांना 'अव्वल' आणण्यासाठी मातोश्रींनी कंबर कसली, सुनंदा पवार कर्जत-जामखेडच्या मैदानात
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 10:53 AM

अहमदनगर : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासाठी अहमदनगरमध्ये मातोंश्रींनी कंबर कसली आहे. निवडणुका नसताना सुनंदा पवार (Sunanda Pawar) कुठल्या कामासाठी पुढाकार घेत आहेत, असा प्रश्न पडला असेल. सध्या कर्जत आणि जामखेड (Karjat Jamkhed) शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आपल्या मुलाच्या मतदारसंघाचा प्रथम क्रमांक यावा, यासाठी स्वतः सुनंदा पवार मैदानात उतरल्या आहेत. (Rohit Pawar mother Sunand Pawar preparation in Ahmednagar for Swaccha Bharat Survey)

आपला मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे. अहमदनगरमधील कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं आहे. यात चक्क आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे.

जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत. मी यात प्रबोधनाचे काम करत असल्याचं सुनंदा पवार यांनी सांगितलं.

आतापर्यंत शंभरहून अधिक बैठका आणि कॉर्नर सभा झाल्या आहेत. ज्या काही समस्या आहेत त्या रोहित यांच्या माध्यमातून दूर होतील, असा विश्वास सुनंदा पवारांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षीचे प्रगतिपुस्तक हे फारसं समाधानकारक नाही. त्यावर लाल रिमार्क खूप आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षेला बसून ते रिमार्क क्लिअर करणे याचं मोठं आव्हान आमच्यासमोर असल्याचं त्यांनी सांगितलं

सुनंदा पवार सध्या कर्जत आणि जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांसोबत एकजुटीने काम करत आहेत. आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या मातोश्री देखील पुढे सरसावल्या आहेत. (Rohit Pawar mother Sunand Pawar preparation in Ahmednagar for Swaccha Bharat Survey)

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेत शासकीय कार्यालय, अंगणवाड्या, हॉस्पिटल, हॉटेल तसेच शहरातील सर्व प्रभात यांचं मूल्यमापन होणार आहे.

खरं तर लोकांची मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान असून त्यावर आम्ही काम करत आहोत. तर हे शहर प्रदूषणमुक्त होऊन सुंदर होईल, असा विश्वास सुनंदा पवार यांनी व्यक्त केला.

खरं तर रोहित पवार निवडून येण्यामागेही त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे. रोहित पवार आमदार झाल्यानंतरही आई त्यांच्या मतदारसंघात फिरतात. तिथल्या प्रत्येक समस्या जाणून घेतात. याचा पुढच्या काळात रोहित पवारांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास बाळगला जातो.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

गाडीतून जाताना खेळण्याचं दुकान दिसलं, आमदारांमधील ‘बाप’ जागा झाला!

(Rohit Pawar mother Sunand Pawar preparation in Ahmednagar for Swaccha Bharat Survey)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.