सहकारी बँका, साखर कारखान्यांना सरकारी हॉस्पिटल चालवू द्या, रोहित पवारांचा प्रस्ताव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का, अशी विचारणा रोहित पवार यांनी केली (Rohit Pawar on Government Hospitals in Rural Area)

सहकारी बँका, साखर कारखान्यांना सरकारी हॉस्पिटल चालवू द्या, रोहित पवारांचा प्रस्ताव
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 1:31 PM

मुंबई : ‘कोरोना’च्या संकटकाळातून बाहेर येण्यासाठी सर्वच स्तरातील व्यक्ती आपापले योगदान देत आहेत. बॉलिवूडपासून राजकीय नेते आणि उद्योजकांपासून सर्वसामान्य नागरिक पुढे सरसावले आहेत. कोणी आर्थिक हात दिला आहे, यात कोणी अत्यावश्यक सेवा बजावण्याची तयारी दर्शवली आहे. राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अनोखा प्रस्ताव मांडला आहे. (Rohit Pawar on Government Hospitals in Rural Area)

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का, याबाबत विचार करण्यात यावा. यामुळे ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा देण्यास मदत होईल.’ अशी कल्पना रोहित पवार यांनी ट्विटरवर मांडली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना यामध्ये मेन्शन केलं आहे.

सध्या अतिरिक्त दुधाची भीषण समस्या निर्माण झाली असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी कोलमडला आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त दुधाची भुकटी तयार करुन ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत/रेशनवर स्वस्त दरात देता येईल का, याबाबत विचार करण्यात व्हावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी सध्या बँकांमध्ये मोठी गर्दी होतेय, त्यामुळे सर्वच बँकांनी आपापल्या अगदी गावपातळीपर्यंतच्या शाखांमध्येही सॅनिटायझर ठेवावं व तसा आदेश बँकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी द्यावा. कोरोना प्रतिबंध व लोकांची सुरक्षा यासाठी हे आवश्यक आहे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

पुण्यातील 86 वर्षीय कॅप्टन भरुचा यांनी तयार केलेल्या डिझाईनप्रमाणे विकास चैतन्य, प्रतीक पाटील, शार्दूल, हितेश पाटील व सुनील किर्दक या उद्योजकांनी 8 दिवसांत केवळ 15 हजार रुपयांत व्हेंटिलेटरवर बनवला. ज्येष्ठांचं ज्ञान आणि तरुणांची जिद्द एकत्र आली तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे, असं म्हणत रोहित पवारांनी काल एक व्हिडिओ शेअर केला होता. भरुचा यांनी डिझाईन केलेल्या व्हेंटिलेटरचं संगणकीय मॉडेल तयार करुन ते सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. (Rohit Pawar on Government Hospitals in Rural Area)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.