Rohit Pawar | स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते – रोहित पवारांचं खोचक ट्विट
हरियाणामध्ये भाजपने शिकवलेला हा धडा राज्यातील मित्रांसाठी संदेश आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला उद्देशून असं खोचक ट्विट राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केलं आहे. 'स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते' असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : हरियाणामध्ये भाजपने शिकवलेला हा धडा राज्यातील मित्रांसाठी संदेश आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला उद्देशून असं खोचक ट्विट राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केलं आहे. ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये मोठी घडामोड घडली. आणि मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणामध्ये भाजपाच सरकार आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपा आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांची आघाडी तुटली. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन ही आघाडी तुटल्याची चर्चा सुरू आहे. याच मुद्यावरून रोहित पवार यांनी सूचक ट्विट करत अजित पवार गट आणि शिंदे गटाला सुनावलं
काय म्हणाले आहेत रोहित पवार ?
हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते’ याचा प्रत्यय आलाच असेल.
सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल..
उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागले तर आश्चर्य वाटू नये. असो, स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, असा खोटक टोलाही त्यांनी लगवला. ते (आमदार) नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
#हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या ‘मित्राला’ भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2024