मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून कबुली

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे

मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं, 'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून कबुली
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 11:33 PM

सांगली : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन डे आठवड्याचा उत्सव सुरु आहे. तरुणाईमध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व आहे. या तरुणाईत अगदी कॉलेजपासून तर राजकीय क्षेत्रातील तरुणांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे (Rohit Pawar speak on his love story). कॉलेजमध्ये असताना माझं कुणाबरोबरही प्रेम झालं नाही, अशी थेट कबुली रोहित पवार यांनी दिली. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते.

तरुणांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “मी मुंबईमध्ये होतो. या सर्व प्रवासात काही प्रमाणात कष्टावर प्रेम होतं. त्यावेळी जीम करायचो. जीमवर प्रेम होतं. पण कॉलेजमध्ये तुम्हा सर्वांना जे प्रेम होतं तसं प्रेम मला काही कधी झालं नाही. व्हॅलेंटाईन डे दोन दिवसांनी येतो आहे. तेही मला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाहत असताना तेव्हा कळालं की दोन दिवसांनी व्हॅलेंटाईन डे आहे. पण बरं झालं आठवलं. तुम्ही सर्वजण ज्या प्रकारच्या प्रेमाचा विचार करतात, तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं. ते प्रेम माझ्या बायकोवर केलं. हेच प्रेम शेवटपर्यंत राहणार आहे.”

“प्रेमाच्या गोष्टी आल्या की शिष्ट्या वाढतात. हे भारी आहे. कॉलेजचं जीवन खूप भारी असतं. मलाही कॉलेजचं जीवन आवडायचं. तेव्हा टेंशन अजिबात नव्हतं. घरुन दोन हजार रुपये महिन्याला यायचे. त्यातच कसातरी महिना निघायचा. कधी पैसे कमी पडले, तर मित्र असायचेच”, असंही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

विद्यार्थ्यांशी बोलताना रोहित पवार यांनी दिल्ली निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. तसेच दिल्लीत भाजपनं अहंकार दाखवला. मात्र, आपने त्यांचा पराभव केला. यात सत्याचाच विजय झाला, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

Rohit Pawar speak on his college love story

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.