Rohit Pawar | भावूक क्षण… आधी आजोबांचं नंतर आत्याचं दर्शन; ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांना दिली शरद पवारांनी अनोखी भेट
राष्ट्रवादीचे नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी आजचा दिवस परीक्षेचा आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे.
विजय गायकवाड, कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 24 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी आजचा दिवस परीक्षेचा आहे. आज ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखलही झाले आहेत. रोहित यांच्या समर्थनासाठी शेकडो कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी त्यांचे आजोबा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचं दर्शन घेतलं. यावेळी त्र्याऐंशी वर्षाच्या आजोबांनी म्हणजे शरद पवार यांनी रोहित यांना राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एक पुस्तक भेट दिलं. शरद पवार यांनी एकप्रकारे रोहित यांच्या हातात विचारांचा वारसाच दिला. हा क्षण अत्यंत भावूक करणारा होता. हे दृश्य पाहून सर्वच गहिवरले होते.
बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यासाठी ते थोड्याच वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत कार्यालयापर्यंत गेल्या होत्या. त्यापूर्वी आज सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांच्या गराड्यात, घोषणाबाजी सुरू असताना रोहित पवार हे मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले. वेळी सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. रोहित पवार हे ईडी चौकशीसाठी जाण्यापूर्वी शरद पवार यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णाकाठ हे पुस्तक भेट दिलं. शरद पवार यांनी एकप्रकारे रोहित यांच्या हातात विचारांचा वारसाच दिला. नंर रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंचाही आशिर्वाद घेतला. तेव्हा सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना संविधानाची प्रत दिली.
काळ असला संघर्षाचा तरी प्रेम, आशीर्वाद, प्रेरणा देणारी इतकी सारी दौलत सोबत आहे…#लडेंगे!#जितेंगे! pic.twitter.com/pTV9u1DiFv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2024
त्यानंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले. असंख्य कार्यकर्त्यांची नारेबाजी, घोषणा यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय आणि ईडी कार्यालयाचा परिसरही दुमदूमन गेला होता. रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शन आणि बॅनरबाजी करण्यात आली. काल रात्रीपासूनच शेकडो कार्यकर्ते आणि त्यांच्या मतदारसंघातील लोक मुंबईत दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ईडी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले
शरद पवार यांची भेट घेऊन रोहित पवार ईडी कार्यालयाकडे निघाले असता त्यांच्या सोबत स्वत: सुप्रिया सुळे होत्या. सुप्रिया सुळे यांच्या हातात संविधानाचे पुस्तक तर रोहित पवार यांच्या हातात एक फाईल आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक घेऊन ईडी कार्यालयात गेले आहेत. मी पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊन निघालो आहे. त्यांनी मला यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक भेट देऊन त्यांच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
#WATCH | NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar goes inside the ED office in Mumbai. NCP working president Supriya Sule also present. pic.twitter.com/O4IRl9esH6
— ANI (@ANI) January 24, 2024
सत्याचा विजय नक्की होणार – सुप्रिया सुळे
दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्यमेव जयते, सत्याचा विजय नक्की होणार, असे त्या म्हणाल्या. रोहितवर जनतेचं प्रेम आहे. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. पण आम्ही या आव्हानांना सत्याच्या मार्गाने सामोरं जाऊ असेही त्यांनी नमूद केलं.
#WATCH | As NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar is being questioned by ED in connection with the Maharashtra State Cooperative (MSC) Bank scam, NCP working president Supriya Sule says “Satyamev Jayate” pic.twitter.com/IGigtsmBpY
— ANI (@ANI) January 24, 2024