रॉयल एनफिल्डची शानदार Meteor 350 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350 ही बाईक आज लाँच करण्यात आली आहे.

रॉयल एनफिल्डची शानदार Meteor 350 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 11:55 AM

मुंबई : रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350) ही बाईक आज लाँच करण्यात आली आहे. 650 ट्विन्सच्या लाँचिंगनंतर रॉयल एनफिल्डसाठी ही महत्त्वाची बाईक आहे. Meteor रेंज ही नव्या इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल प्रोडक्टच्या रुपात सादर केली आहे. ही शानदार बाईक तीन व्हेरिएंट्ससह (फायरबॉल, स्टॅलर आणि सुपरनोव्हा) लाँच करण्यात आली आहे. Royal Enfield Meteor 350, थंडरबर्ड 350X ला रिप्लेस करणार आहे. (Royal Enfield Meteor 350 India launch Live updates)

या बाईकमध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आली आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन देण्यात आलं आहे. मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजिन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. या बाईकचं इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.

मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनलसह आहे. Meteor 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे.

RE Meteor 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी आहे. Benelli Imperiale 400, Jawa 300 आणि नुकतीच लाँच झालेल्या Honda H’Ness CB350 या गाड्यांना RE Meteor 350 टक्कर देईल.

गेल्या आठवड्यात कंपनीने या शानदार बाईकचा टीझर लाँच केला होता. हा टीझर पाहिल्यापासून अनेक तरुण या बाईकच्या लाँचिंगची वाट पाहात होते.

संबंधित बातम्या

फीचर्स नवे, किंमत तेवढीच, ‘रॉयल एनफिल्ड बुलेट 500’ नव्याने लॉन्च

बेनेली इम्पीरिअलची नवी बाईक लाँच, रॉयल एनफिल्डला मोठी टक्कर

रॉयल एनफिल्डचं नवं मॉडल भारतात, पाहा किंमत आणि फीचर

(Royal Enfield Meteor 350 India launch Live updates)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.