RSS प्रमुख मोहन भागवत यांना ASL तर शरद पवार यांना Z प्लस, दोन्ही सुरक्षेत काय वेगळेपण ?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना अलिकडेच केंद्राने Z प्लस सुरक्षा पुरविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावरुन शरद पवार यांनी देखील माझ्या दौऱ्याची माहीती काढण्यासाठी मला सुरक्षा पुरविली असावी अशी मिश्कील प्रतिक्रीया व्यक्त केली होती.

RSS प्रमुख मोहन भागवत यांना ASL तर शरद पवार यांना Z प्लस, दोन्ही सुरक्षेत काय वेगळेपण  ?
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 2:22 PM

शरद पवार यांचा भाजपा विरोधात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात मोठा रोल होता. याच शरद यांनी साल 2014 मध्ये महायुतीचे सरकार येण्यापूर्वी अचानक भाजपाला बाहेर पाठींबा देऊन शिवसेनेचे महत्व कमी करण्यास देखील मागे पुढे पाहीले नव्हते. आता तर भाजपाच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहीलेल्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे दोघे अदानी यांचे मित्र आहेत.तर अशा लव्ह एण्ड हेट रिलेशन शिप असलेल्या शरद पवार यांनी राज्याची झेड प्लस सुरक्षा असताना त्यांना अचानक केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरवण्याने अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना ASL सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर काय आहे नेमकी एएसएल आणि झेड प्लस सुरक्षा पाहूयात..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नुकतिच केद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना ASL सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतलेला आहे.दोन्ही सुरक्षा वेगवेगळ्या नाहीत तर दोन्ही सुरक्षा थोड्याफार सारख्याच म्हणजेच झेड प्लसच आहेत. परंतू या सुरक्षा एक मुलभूत फरक आहे. काय आहेत या सुरक्षामागील मनुष्यबल आणि किती ताफा तैनात असतो ते पाहूयात…

केंद्रीय गृहमंत्रालय अति महत्वाच्या व्यक्तींना X, Y, Y Plus, Z, Z Plus दर्जाची सुरक्षा पुरवित असते. या सुरक्षा यंत्रणेत मनुष्य बळ आणि वाहनांच्या ताफा यात काही मुलभूत फरक असतो. या व्यतिरिक्त आणखी एक एसपीजी सुरक्षा पुरविली जाते. ही सुरक्षा केवळ देशांच्या पंतप्रधानांना पुरविली जाते. त्यानंतर झेड प्लस दर्जाच्या सुरक्षा श्रेणीचा क्रमांक लागतो. प्रत्येक दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेतील ताफ्यात असणाऱ्या जवांनाची संख्या वेगवेगळी असते.

झेड प्लस सिक्युरिटीचे प्रकार किती

झेड प्लस सिक्युरिटीत ‘झेड प्लस’ सुरक्षा कव्हर, झेड प्लस विथ एनएसजी सुरक्षा कव्हर आणि झेड प्लस विथ ASL सिक्युरिटी यांचा देखील समावेश असतो.

ASL झेड प्लस सिक्युरिटीची खासियत…

ASL सुरक्षा कव्हर झे़ड प्लस सिक्युरिट सर्वात खास असते. ही सुरक्षा पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला पुरविलेल्या एसपीजी सुरक्षा कव्हरच्या धर्तीवर असते. म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षे सारखे नियम एएसएल सुरक्षा कव्हरमध्ये देखील असतात . एएसएल म्हणजे एडव्हान्स सिक्युरिटी लायसन होय. यात केवळ जवान केवळ सिक्युरिटी दिलेल्या व्यक्तींसोबत राहात नाहीत तर ते जेथे जाणार असतील त्या ठिकाणी आधीच हे जवान जाऊन सुरक्षेचा आढावा घेत असतात.

अशा व्यक्तींचा सुरक्षेतील अधिकारी या व्यक्तीचा जेथे दौरा असेल तेथे आधीच पोहचून तेथील सर्व परिस्थितीचा ताबा स्थानिक पोलिसांकडून आपल्या हातात. घेतात. व्हीव्हीआयपींचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग कोणते. आपात्कालिन मार्ग कोणते याचा संपूर्ण अभ्यास आधीच केला जात असतो. रस्त्याच्या दुतर्फा देखील साध्या वेशातील माणसे ठेवलेली असता. देशात केवळ मोजक्या लोकांना अशा प्रकारचे संरक्षण दिले जाते. त्यात गृहमंत्री देखील आहेत. आयबी देखील या सुरक्षेत सामील असते. आयबी सोबत एकत्रित काम केले जाते.

झेड प्लस एनएसजी कव्हर म्हणजे काय ?

झेड प्लस सिक्युरिटीमध्ये एक एनएसजी कव्हर देखील असते. एनएसजी कमांडो देखील यात सहभागी असतात.एनएसजी कमांडोना या व्यक्तीला एका ठिकाणांवरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचविण्याची जबाबदारी असते. एनएसजी कमांडो घरात सुरक्षा देत नाहीत तर ते कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी काम करीत असतात.

केवळ झेड प्लस सिक्युरिटी म्हणजे काय ?

झेड प्लस सिक्युरिटीत अनेक जवान सुरक्षा पुरवित असतात. यात एकूण 36 जवानांचा ताफा असतो. यात काही जवान एनएसजी तर काही जवान सीआरपीएफ, सीआयएसएफ असतात. ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेत काही राज्य पोलिस दलातील जवान देखील सामील असतात. झेड प्लसनंतर झेड, वाय प्लस, वाय, एक्स आदी सुरक्षेच्या श्रेणी आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.