SSC and HSC results date | दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण

राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

SSC and HSC results date | दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 11:16 AM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन 4 लागू करण्यात (SSC and HSC results date) आला आहे. आधी राज्य सरकारने मग केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात अनेक परीक्षा रद्द झाल्या, तर ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. (SSC and HSC results date)

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं आहे.

वाचा : EXCLUSIVE : दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के?

कोरोनामुळे दहावी आणि बारावीचा निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिका शाळा, महाविद्यालयात अडकल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प आहे. परिणामी नऊ विभागाच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निकालाच्या तारखा जाहीर करता येणार नाहीत, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गेल्या महिन्यात दहावीचा भूगोलाचा पेपर आधी पुढे ढकलला होता. त्यानंतर हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.  21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता.  त्यानंतर हा पेपर रद्द करुन मागील पेपरमधील सरासरीने गुण देण्यास शिक्षण विभागाने सांगितलं होतं.

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

संबंधित बातम्या

EXCLUSIVE : दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के?

दहावी-बारावीचे निकाल वेळेत लावण्यासाठी एसएससी बोर्डाची लगबग 

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.